Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीघोणसपूर महाबळेश्वर ग्रामीण भागाचे विदारक चित्र ; आंबेनळी ते पोलादपूर घाट बंद...

घोणसपूर महाबळेश्वर ग्रामीण भागाचे विदारक चित्र ; आंबेनळी ते पोलादपूर घाट बंद असल्याने ग्रामस्थांची होतेय भर पावसात पायपीट ; महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यायी मांघर ते दुधगाव रस्ता व्हावा अशी स्थानिकांची मागणी

सातारा :- महाबळेश्वर तालुक्यातील, घोणसपूर गाव हे मधु मकरंद गड याच्या पायथ्याशी असून येथील रहिवासी हे पिढ्यानपिढ्या स्थानिक गावचे रहिवासी आहेत . या स्थानिकांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही आजपर्यंत गावाला हक्काची रहदारीच्या रस्त्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी रस्ता नाही . वन खात्याची अडचण सांगून प्रत्येक वेळी लोकांची पिळवणूक ही आजपर्यंत प्रशासन करत आहे . लोकांनी गेल्या १५ वर्षांमध्ये श्रमदान करून कच्च्या स्वरूपात रस्त्याची व्यवस्था केली. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरी सुद्धा ग्रामीण भागातील सर्व गावात, वाडी वस्ती जोडणारा कायमस्वरूपी डांबरी रस्ता नाही, भारत देश चंद्र्यान 3 ला जात असतांना डोंगरी ग्रामीण भागात दळणवळणासाठी साधे रस्ते नाहीत हे  महाराष्ट्रातील आणि देशातील ग्रामीण भागाचे दुर्दैव आहे. नव्याने पाचशे, हजार एकर मध्ये होणाऱ्या सहारा सिटी, लवासा सिटी, यासारखे धनिक लोकांचे व कंपनीच्या व्यावसायिक भांडवलदारांना कधीही वन खात्याची  अडचण आली नाही. परंतु ग्रामीण भागातील ज्यांनी इतके वर्षे जंगल संपत्ती जीवापाड जपली लोकांची हक्काची रहदारीची व्यवस्था करायला किचकट अशी वन खात्याची परवानगीचे प्रश्न राज्य सरकार, व केंद्र सरकार, कोणत्यातरी अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधी मांडेल का ???

आजची हि बातमी महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गावातील आहे, श्रीमती. कुसुम संभाजी जंगम वय ६५ लकवा (पॅरलिसीस) ने आजारी रुग्णासाठी दवाखान्यात आणण्यासाठी नातेवाईकांना किमान 12 किलोमीटरचा महाबळेश्वरपर्यत भरपावसात चार तास पायी प्रवास करावा लागला .
कारण येथील दुधगाव सोसायटी या मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची मंजुरी असलेली पण फक्त स्थलांतरच्या परवानगीसाठीची फाईल सरकारी उदासीनतेमुळे मंत्रालयात धुळ खात बसलीये.
सध्याच्या अतिवृष्टीमध्ये आंबेनळी ते पोलादपूर घाट बंद असल्या कारणाने ग्रामस्थांना चार साडेचार तासाचा पायी प्रवास करावे लागेल आंबेनळी घाट बंद असल्या कारणाने, महाबळेश्वरला जाण्यासाठी म्हणून पर्यायी मांघर ते दुधगाव रस्ता व्हावा ही अपेक्षा स्थानिक पंचक्रोशी आणि ४० गाव ग्रामस्थ २०वर्षापासून करतेय . हा रस्ता आर्थिक फंड आणि वनखात्याच्या परवानगी मिळविण्यासाठी दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा अभाव जाणवतोय म्हणुन रखडलाय.

सदर कोयना खोऱ्याचा भाग हा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हि अजूनही रस्ता, आरोग्य आणि इतर मूलभूत गोष्टीसाठीच झगडताना दिसतोय आणि याच मुलभूत गोष्टीच्या आभावाने येथील युवक स्थलांतर होत आहे. महाबळेश्वर शहर आणि ग्रामिण भाग यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे. आणि हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करीत आहोत , पण आम्हाला काम करतांना सरकारी अनास्थेमुळे प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय. पण सध्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे विकासाचे आशादायक चित्र उभे राहण्याची शक्यता वाटते.
~ डॉ. कुलदिप शिवराम यादव.
सामाजिक कार्यकर्ते.

घोणसपूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अजूनही आदिवासीचेच जगण जगत आहोत आज भारत विश्वगुरु बनन्याच्या गोष्टी वाचतो पण आम्हाला या अतिवृष्टीत जवळचा दवाखाना आणि रस्त्याच्या आभावी डालग्यात पेशन्ट टाकून महाबळेश्वर पर्यत न्यावे लागत असेल तर मग आमच्या सारखे दुर्दैवी कोण असेल…???
कृपया विषयाच्या माहितीसाठी #मांघर_ते_दुधगाव_रस्ता हा हॅशटॅग चेक करावा.
श्री किरण जंगम.
स्थानिक ग्रामस्थ.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular