महाबळेश्वर ः महाबळेश्वरला नैसर्गिक संपदा मोठी आहे. मिनी काश्मिर असतानाही या पर्यटनस्थळाचा म्हणावा तितका विकास झाला नाही. पर्यटन वाढले तरच येथील भूमिपुत्र मोठे होतील. यासाठी महाबळेश्वरला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकास करणार असल्याचे शिवसेना, भाजपा, रिपाई व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार ना. नरेंद अण्णसाहेब पाटील यांनी सांगितले.
महाबळेश्वर येथे पदयात्रा व व्यापार्यांच्या गाठीभेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह शिवसेना, रिपाई व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णसाहेब पाटील यांच्या महाबळेश्वर येथील पदयात्रेस स्थानिक लोकांसह कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी ना. नरेंद्र पाटील यांनी येथील स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना एक सुरक्षितेची जाणीव करून दिली. यापुढे महाबळेश्वरला विकासापासून कोणीही वंचित ठेऊ शकणार नाही. असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी तरुणांना रोजगार, पर्यटन वाढीस चालना मिळण्यासाठी तसेच येथील भूमिपुत्रांच्या प्रगतीचे आश्वासन देऊन व्यापार्यांना दहशतमुक्त व्यापार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
महाबळेश्वरचा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकास करणार ः ना. नरेंद्र पाटील
RELATED ARTICLES

