सातारा : राष्ट्रीय समाज पक्ष हा फक्त धनगर समाजाचा नसून तो हा पक्ष सर्व समावेशक पक्ष असल्याचे मत पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर यांनी सातारा येथील झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच रासपचे नेते महादेव जानकर हे सातारा येथे नियोजन भवनात बैठकीसाठी आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. यावेळी सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, यांचा पदस्पर्शाने पुणित झालेल्या या सातारा जिल्ह्याला मी चांगले काम करून मिळालेल्या संधीचे सोने करणार आहे.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मुलांना उद्योगपती कसे करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या मला मिळालेल्या खात्याचा अभ्यास करीत आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, तसेच पंकजाताई मुढे यांच्यामुळे व स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या आशिर्वादाने मला ही संधी मिळाली. अधिकारी, शेतकर्यांच्या बांधावर कसा जाईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गायींच्या दुधाचा दर कसा वाढला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पशुसंवर्धन खाते हे माझ्या मनासारखे असून, मुख्यमंत्र्यांमुळे मला या खात्यात चांगले काम करता येईल. महायुतीतील घटक पक्षांना न्याय मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. रासप हा पक्ष फक्त धनगर समाजाचा नसून या पक्षात सर्व जाती-जमातीचे, बहुजन लोक आहे. त्यामुळे हा पक्ष फक्त एकाच जातीचा म्हणता येणार नाही.
मराठा आरक्षण, न्यायालयात अडकले आहे. तसेच धनगर समाजाचे आरक्षणही मला अडकावयाचे नाही. हे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण मिळेल. आरक्षर देत असताना काही गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे आरक्षण मिळणेस वेळ होत आहे. पण या समाजाला आरक्षण मिळेल याची खात्री त्यांनी यावेळी दिली. तसेच पक्ष शिस्तीबद्दल सांगताना, पक्षात चळवळ म्हणून वळवळ करणारे कार्यकर्ते नकोत म्हणून मी जिल्ह्यात फेरबदल केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे सांगत जिल्ह्यात शेखर गोरे यांचे चांगले काम असल्याने त्यांच्याकडेच याची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना डीपीडीसीच्या बैठकीत निमंत्रीत सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
शेखर गोरे सतत राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे पत्रकारांनी सांगितले नंतर जानकर यांनी शेखर गोरे शेवटपर्यंत माझ्याबरोबरच राहणार असल्याचे सांगत त्यांना मी आमदार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रासप हा धनगरांचा पक्ष नाही! : मंत्री जानकर
RELATED ARTICLES