कराड : मलकापूर नगरपंचायतीने एप्रिल 2016 पासून कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता पाणीपट्टी निकालात व दरात बदल करून सरासरी 6.50 रुपयांनी पाणीपट्टी दरात वाढ करून मासिक 22500 लिटर पुढील ग्राहकांस रु. 5 ने वाढ करून 60 टक्के पाणी वाढीचा बोजा नागरिकांवर लादला आहे. याउलट व्यावसायिक ग्राहकांवर केवळ 20 टक्के दरवाढ करून घरगुती ग्राहकांवर अन्याय केला आहे. या विरोधात नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन शिवसेना मलकापूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अन्यायकारक दरवाढीला शिवसेनेने विरोध केला होता. यावर मुख्याधिकारी, पदाधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत शिवसेना पदाधिकारी नितीन काशिद, मधुकर शेलार, सूर्यकांत मानकर, संजय चव्हाण यांची चर्चा होऊन सदर दरवाढीबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून दरवाढीचा फेर आढावा घेण्याचे ठरले. त्यानुसार नगरपंचायतीने जाहीर नोटीसीद्वारे हरकती व सूचना मागवून सदर प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे. तरी या योजनेचा लाभ घेणार्या नळ ग्राहक नागरिकांनी दरवाढीबाबत आपल्या सूचना व हरकती जुलै अखेर नगरपंचायत मलकापूर कार्यालयात लेखी स्वरुपात नोंदवाव्यात, असे आवाहन शिवसेना मलकापूरच्या वतीने करण्यात आले आहे
वाढीव पाणीपट्टी दराबाबत हरकती दाखल कराव्यात..
RELATED ARTICLES