सातारा : येथे सुरू असलेल्या माणदेशी महोत्सवामध्ये माणदेशी उद्योजिका पुरास्काराचे वितरण सुप्रसिध्द सिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध अडचणींवर मात करून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यार्या 16 माणदेशी उद्योजीकांचा यावेळी प्रशस्तीपत्र, धनादेश व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. मनीषा दुपडे -कोळेगाव शेती व डाळींबाची बाग, पुष्पलता कुंभार – कोळेगाव चप्पल बनवण्याचा व्यवसाय, शिल्पा डोईफोडे – खेड सातारा मसाला विक्री व्यवसाय, सुवर्णा बावणे – सातारा चिरमुरे फुटणे व्यवसाय, पुष्पांजली मगर -बिदाल दुध विक्री व पोल्ट्री व शेली पालन, लीना गायकवाड -फलटण चकली व्यवसाय, जयश्री चव्हाण – सिद्धेश्वर कुरोली मसाला व्यवसाय धान्य व कडधान्य, नीता भोईटे – लोणंद मोबाईल व कोळसा शेगडी, वैशाली पिसे – म्हसवड वडापाव गाडी, माधुरी भोसले -देगाव भाजी पाला विक्री व्यवसाय, विद्या किरवे -भुईंज कापडी पिशवी व्यवसाय, रुपाली पावणेकर – धायरी पुणे टी शर्ट व्यवसाय, रुपाली शिंदे – म्हसवड डफली डमरू बनविणे व्यवसाय, मनीषा शिंदे – धायरी पुणे शेवया बनवणे, सीमा गवळी – सातारा साबण,अगरबत्ती,राजश्री जाधव -निमसोड गोट डॉक्टर. य ावेळी या सर्व उद्योजिका महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना कशा प्रकारे उद्योग सुरु केला काय काय अडचणी आल्या त्यावर मात कशी केली तसेच व्यवसायाची सुरुवात करताना माण देशी फौन्डेशन कडून कशा प्रकारे प्रशिक्षण व कर्ज मिळले याची खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली . रुपाली शिंदे म्हणाल्या कि माण देशी ने आत्मविश्वास वाढवला व मालाची विक्री कशी वाढवावी व ओंन लाईन व्ह्यवहार कसे करायचे याबाबत मार्गदर्शन मिळाले त्यामुळेच आम्ही आता चांगल्या प्रकारे व्यवहार करू शक्लातो. तसेच यावेळी 200 शालेय गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी सायकल मिलालेलेल्या मुलींनी आपले मनोगत व माणदेशी फौडेशनच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी या ,मुली म्हणाल्या कि शाळेत जाणेसाठी करावी चार ते पाच किलीमीटर ची पायपीट आता कमी होनार आहे व या मिळालेल्या वेळेचा सदुऊपायोग करून उच्च शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार या मुलींनी व्यक्त केला.
श्रीमती चेतना सिन्हा यांच्या हस्ते माणदेशी वस्तुंची आठवण भेट देऊन प्रमुख पाहुन्या सिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या कि शहरामध्ये व्यवसाय करून प्रगती करण्यासाठी खूप संधी उपलब्ध असतात परंतु माणसारख्या दुष्काळी तालुक्यात जेन, घोंगडी, विविध प्रकारचे कडधान्याची शेती इत्यादी कष्टाची कामे करून स्वाभिमानी व स्वावलंबी जीवन जगणार्या या महिलांच्या कष्टाला नमस्कार आहे.
माणदेशी फौडेशन हि महिलांची संघटना असून पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे कला कौशल्य व कष्ट व्यवसाय रूपाने सर्व जगा समोर यावे या उद्देशाने या महिलांना मार्केटची संधी माणदेशी फौडेशन तर्फे उपलब्ध करून देण्यात येते. या महिला स्वत: वस्तुंचे उत्पादन करतात व विक्रीही करतात. जगभरातील महिलांच्या तुलनेत माणदेशी महिला सुध्दा अजिबात कोठेही कमी नसून रूपे डेबिट कार्डचा वापर देखील या महिला करून लाखो रुपयांचे व्यवहार स्वत: करीत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.
मोठा व्यवसाय उभा करणार्या या महिलांचे खरे भांडवल हे पैसे नसून त्यांचे धाडस व कष्ट हेच आहे. व या महिलांच्याकडे आता इतका आत्मविश्वास आला आहे कि देशभरात कोठेही या महिला भाषेच्या अडचणी शिवाय व्यवसाय करू शकतात.
यावेळी बोलताना निवेदिताजी सराफ म्हणाल्या कि चेतना भाबीनी लावलेल्या माण देशी रोपट्याचे आता खूप मोठ्या वृक्षात रुपांतर झाले असून यामध्ये काम करणार्या सर्वांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. स्त्री सक्षम असेल तर पूर्ण कुटुंब सक्षम होता व यामुळेच माणदेशी करत असलेले कार्य खूप महत्वाचे आहे. व हे काम फक्त जिल्ह्यापुरते मर्यादित नसून पूर्ण देश घडण्यास मदत होईल. अशा या उद्योजीकांचा सन्मान करण्याची संधी मला दिली याबद्दल मी अतिशय आनंदी असून हा माझाच सन्मान आहे. यावेळी स्वतःच्या असलेल्या हंस गामिनी या साडी उत्पादन्याच्या प्रदर्शनात माणदेशी साठी एक स्टॉल मोफत देण्याची घोषणा केली.
या महोस्तवाच्या दुसरयाच दिवशी व्यवसायाची उलाढाल कोटीच्या घरात गेली आहे.
यावेळी चार्टर्ड अकौंटंट उदय गुजर,चार्टर्ड अकौंटंट सचिन अग्रवाल,चार्टर्ड अकौंटंट अग्रवाल, माण देशी फौंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, कार्यकारी विश्वस्त रेखा कुलकर्णी,मुख्य प्रशासन अधिकारी वनिता शिंदे इ. उपस्थित होते.