Monday, May 19, 2025
HomeUncategorizedब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मातोश्री प.पू. गीतामाई यांचा १२२वा पुण्यतिथी सोहळा असंख्य...

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मातोश्री प.पू. गीतामाई यांचा १२२वा पुण्यतिथी सोहळा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

मायणी (सतीश डोंगरे मायणी) : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मातोश्री प.पू. गीतामाई यांचा १२२वा पुण्यतिथी सोहळा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत त्यांचे माहेर गाव असलेल्या खटाव तालुक्यातील कलेढोण येथील गीतामाई मंदिरात संपन्न झाला .

कलेढोण येथील गीतामाई मंदिरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत गुलालाचा ( फुले टाकण्याचा ) कार्यक्रम संपन्न झाला .त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत
गीतामाईंच्या प्रतिमेची पालखीत प्रतिमा ठेवून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली .नंतर बारा वाजताआरती होवून सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .सप्ताह भर चाललेल्या या पुण्यतिथी सोहळ्यात प्रवचन, किर्तन, भजन, अन्नदान आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इनामदार बंधू यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular