Sunday, May 18, 2025
Homeठळक घडामोडीमायणी स्टेट बँक ए टी एम बनले आहे कचराकुंडी ; कर्मचारी नसल्याने...

मायणी स्टेट बँक ए टी एम बनले आहे कचराकुंडी ; कर्मचारी नसल्याने येथील सुरक्षा बनलीय रामभरोसे

मायणी :- (सतीश डोंगरे मायणी)   मायणी येथील चांदणी चौक येथे असलेले स्टेट बँकेचे ए टी एम ला सध्या कचराकुंडी चे स्वरूप आले असून या कडे संबंधित कंपनी तसेच स्टेट बँकेचे दुर्लक्ष झाले आहे .

मायणी येथे तीन बँकांचे एटीएम उपलब्ध आहेत. त्यातील बँक ऑफ इंडिया व मायणी अर्बन बँक या दोन बँकांच्या शाखा मायणी येथे कार्यरत आहेत . तर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा मायणी येथे नाही. ती मायणी येथून सात किमी वरील चितळी ता खटाव येथे उपलब्ध आहे . यामुळे स्टेट बँकेच्या ग्राहकांना आपले व्यवहार करण्यासाठी चितळी येथे जावे लागत आहे . परंतु काही वर्षांपासून आपल्या व अन्य बँकांच्या ही एटीएम ग्राहकांना चांदणी चौकात स्टेट बँकेने एटीएम उपलब्ध करून दिले. परंतु ,आज एटीएम मध्ये सर्व स्लिप च्या कागदाचा ढीग साचला आहे,सर्वत्र जाळे झाले आहेत,तर दरवाजाही तुटला आहे . यामुळे सध्या एटीएम कचराकुंडीचे स्वरूप आल्याचे दिसत आहे .

सर्वत्र एटीएम मध्ये एक सुरक्षा कर्मचारी नेमण्यात येत असतो . त्याच्याकडे एटीएम च्या सुरक्षतेची ,स्वच्छतेची तथा ग्राहकांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात येत असते . परंतु स्टेट बँक शाखा चितळी याच्याशी संलग्न असलेले हे एटीएम व संबंधित कंपनी यांचेकडून आज पर्यंत येथे सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आली नाही . त्याचा परिणाम एटीएमच्या आजच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे . तरी याप्रश्नी त्वरित लक्ष घालून एटीएम ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मायणी व परिसरातील एटीएम ग्राहक करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular