सातारा ः येथील लेक लाडकी अभियान दिग्दर्शित बालविवाहावर आधारित दप्तर हा लघुपट दि. 4 ते 9 डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झटकणार आहे. या लघुपटाच्या निमित्ताने बालविवाह रोखण्यासाठी राज्यभरात चर्चा सुरु झाल्या. माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना राज्य महिला आयोगाच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी केलेल्या ट्विटची दखल घेत आवाज उठवला. यासंदर्भाने उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला बाल विवाह रोखण्यासाठी विचारणा करण्यात आली. तद्नंतर जिल्हा निहाय मराठवाड्यात समित्या गठीत करण्यात आल्या. तीन बालविवाह रोखले गेले असून सत्तर बालविवाह रोखण्यासाठी शासन यंत्रणा कामाला लागली माहिती या लघुपटाच्या निर्मात्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. देशपांडे म्हणाल्या, दिल्ली महानगरपालिकेच्या कन्हवेन्शन सेंटर येथे दि. 7 डिसेंबर रोजी जगभारतील 198 चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहा मराठी लघुपटांचा प्रदर्शित होणार असून त्यात सातारा येथे बनविण्यात आलेला बालविवाहाच्या प्रश्नावर आधारीत दप्तर हा लघुपटाचा समावेश आहे. जगभरातून आलेल्या हजारो चित्रपटामधून सातारच्या दप्तरची निवड होणे म्हणजे सातारच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक जगतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या महोत्सवासाठी विशेष पाहुणे म्हणून कलाकारांना निमंत्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलास जाधव, संकलन संतोष भंडारी, सहदिग्दर्शन जमीर आत्तार, कलाकार रिध्दी देशपांडे, कैलास जाधव, वर्षा देशपांडे, शैलेंद्र पाटील, राहुल तांबोळी, चैत्रा व्ही. एस. पार्श्वगायक अंजली आपटे भिडे, संगीत सुजीत गायकवाड, अनिकेत मोहिते, हरिश कांबळे, साऊंड जतीन केंजळे, कॅमेरामन केतन मोहिते यांनी केले आहे.