वाई : छ.शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध हा हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट संपविण्यासाठी केला. अफजल खानाने त्यावेळी हिंदूंच्या महिलांवर अत्याचार केले, गाईंची कत्तल केली, हिंदूंची मंदिरे पाडली, त्याच्या अत्याचाराच्या जाखडातून रयतेला मुक्त करण्यासाठी छ.शिवाजी महाराजांनी हे पाऊल उचलेले होते. याला शेकडो वर्षांचा कालावधी होवून गेला तरीही अफजलखान प्रवृत्ती आजही समाजात स्पष्टपणे वावरताना दिसत आहे. समाजातील अफजल खान प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी समाजातील वैचारिक दहशत वाद संपवावा लागेल. असे परखड मत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष- अॅड.विरेंद्र इचकरंजीकर, (मुबई उच्च न्यायालय) यांनी वाईतील प्रतापगड उत्सव समितीने आयोजित केलेल्या वीर जीवा महाले पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना व्यक्त केले.
यावेळी प्रखर हिंदुत्ववादी, पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर यांना वीर जीवा महाले पुरस्कार तर पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार हा मुंबई उच्च न्यायालयाचे-अॅड.विरेंद्र इचकरंजीकर, यांना श्रीमंत छ.शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रताप गड उत्सव समितीच्या निमंत्रक- श्रीमती विजयाताई भोसले, नूतन नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष – रवी कोठावळे, हिंदू स्वाभिमान प्रतिष्टानचे – अॅड. देविदास शिंदे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख – प्रदीप माने, शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख- अॅड.शिरीष दिवाकर, आर.एस.एस चे- यशवंत लेले, नगरसेविका वासंती ढेकाणे, रुपाली वनारसे, सुम्मय्या इनामदार, नगरसेवक- चरण गायकवाड, अनिल सावंत, सतीश वैराट, सुनिता चक्के, जीव महाले तेरावे वंशज- श्रीमती सुमन सपकाळ, प्रताप गड उत्सव समितीचे खजिनदार- सुहास पानसे, विवेक भोसले, शिवसेना वाई शहर प्रमुख- गणेश जाधव,योगेश चंद्रस, पंकज शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड.विरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, हिंदू धर्माचे काम करणे गुन्हा झाला आहे. तसेच समाजातील दाभोळकर प्रवृत्ती हिंदू धर्माच्या परंपरेवर चीकीस्ता च्या नावाखाली टीका करण्याचेच काम करतात आम्ही सुध्दा दाभोळकरांच्या चीकीस्ता करून घोटाळे बाहेर काढले. त्यांची संघटना नक्षल वादाला खतपाणी घालणारी आहे. त्यांचे सत्य बाहेर काढून त्याच्या संघटनेचा बुरखा फाडण्याचे काम आम्ही करताच राहणार.
छ.शिवाजी राजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या तरुण पिढीला नितांत गरज आहे. आधुनिक बदलामुळे तरुण पिढीला छ. शिवाजी महाराजांच्या विचाराचा विसर पडला आहे. माजी उपमहापौर – सुरेश नाशिककर म्हणाले, चोहो बाजूनी हिंदुत्वावर घाला होत आहे. राज्यकर्त्यांना सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाचा विसर पडत आहे. आपल्या देशात धर्मासाठी झगडणार्या माणसांची संख्या अल्प असून हिंदूच अल्पसंख्यांक झाले आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण वाईच्या नूतन नगराध्यक्षा- डॉ. प्रतिभा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, व जीव महाले, पंताजी काका बोकील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. त्यानंतर चित्तथरारक शास्त्रांची प्रात्यक्षिक व शाहीर हेमंत मावळे यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मा. सुरेश नाशिककर यांना वीर जीवा महाले पुरस्कार, मानाचे कडे, मानचिन्ह, सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. तर पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार अॅड.विरेंद्र इचलकरंजीकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक- मंदार खरे, सूत्र संचालन, आनंद पटवर्धन, आभार, यशवंत लेले यांनी मानले.