म्हसवड दि: जिवंत माणसांच्या जमिनी बाळकावल्या जातात. पण नवसाला पावणाऱ्या म्हसवड येथील सिद्धनाथाच्या भूमीत आता लिंगायत समाज्याच्या दफन भूमीतच अतिक्रमण झाले आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी स्वातंत्र्य दिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी प्रश्न सुटला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिले आहेत . कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासकीय कामकाज केले जाते. दुष्काळी भागातील माण तालुक्यामध्ये प्रशासनाच्या चांगल्या कामांपेक्षा अनेक कामांमध्ये शंका उपस्थित होत आहेत .त्यामध्ये आता म्हसवड नगरीच्या लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नाची भर पडली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते व निर्भिड आंदोलक श्री अजिनाथ केवटे यांनी उपोषण सुरू केले आहे . या उपोषणाला स्वतः महाविकास आघाडी घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील , माजी सनदी अधिकारी श्री. प्रभाकर देशमुख यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते तसेच वाणी, तेली, कुंभार, जंगम या लिंगायत समाजातील अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. म्हसवड मध्ये कोर्ट कचेरी व आंदोलन केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. ही बाब आता लोकशाहीला घातक ठरू लागलेली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी या आंदोलनाची धार वाढवली आहे. म्हसवड नगरपालिकेचे मुख्यधिकारी व संबंधित अधिकारी हे याबाबत निर्णय का घेत नाही ? त्यांच्यावर नेमकं कोणता दबाव आहे? का इतर कारण आहेत ? याची आता चर्चा सुरू झालेली आहे.
माण तालुक्यातील ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या म्हसवड येथील भूमापन क्रमांक २३६ मधील आठ गुंठे व भूमापन क्रमांक २३७ मधील सतरा गुंठे अशी मिळून २५ गुंठे जागा ही लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी होती. दिनांक ३१ ऑगस्ट १९९८ रोजी तात्कालीन मुख्याधिकारी रुपेश चव्हाण यांच्या नावे ही जागा असताना आता या जागेमध्ये उसाचे पीक व पत्र्याच्या गाळ्यांची नोंद झाली आहे. घरपट्टी सुद्धा वसूल केली जात आहे. सदर जागेमध्ये आजही लिंगायत समाजामध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर धार्मिकदृष्ट्या याच जागेमध्ये त्याचे दफन केले जाते. अशी माहिती श्री केवटे यांनी दिली आहे.
गेली १४ दिवस श्री अजिनाथ केवटे हे बेमुदत आंदोलन करत असून त्यांच्या या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिलीप तवटे, भारत कुंभार, महेंद्र शेटे, राजेंद्र सुकरे, चंद्रकांत स्वामी यांच्यासह लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या म्हसवड नगरीतील अनेक बांधव सहकार्य करत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी रास्त मुद्दा हातात घेतल्यामुळे म्हसवड नगरपालिका निर्णय घेण्यास विलंब लावत असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. स्वातंत्र्यदिनी दिनांक १५ ऑगस्ट रोजी आंदोलक श्री केवटे हे नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदन करण्याच्या भूमिकेशी ठाम आहेत .त्यांना त्यांच्या भूमिकेपासून परावृत्त करणे. याला प्राथमिकता द्यावी. अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, याबाबत नगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांची बाजू समजू शकलेली नाही.
………………………….
फोटो- माढा खा. धैर्यशील मोहिते- पाटील यांना निवेदन देताना आंदोलक अजिनाथ केवटे व मान्यवर (छाया- अजित जगताप, म्हसवड)
सिद्धनाथाच्या भूमीत स्मशानभूमीसाठी अजिनाथांचा आक्रोश…
RELATED ARTICLES