(अजित जगताप )
पाटण दि: सध्या अतिवृष्टीमुळे अनेक घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही जागेपर्यंत जिल्हा प्रशासन पोहच शकले नाही . मात्र ,पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या मिरगाव गावात सातारा जिल्हा पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार रात्रीच्या गडद अंधारातही मिरगावला प्रशासन भेट दिली . या भेटीच्या वेळी कुठलेही भूस्खलन झाले नाही.
कोयना धरणाने प्रसिद्धीस पावलेल्या पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरातील मिरगाव या छोट्याशा खेड्यात २०२१ मध्ये भूस्खलन झाले होते . मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. गेले दोन आठवडे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचनेनुसार तातडीने पाटण प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी कार्यालयीन कामकाज उरकून रात्री पाहणी करून कोणीही अडचणीत नाही. याची खात्री करून घेतली.
भूस्खलन बाधित लोकांना निवारा देण्यासाठी
कोयनानगर येथील १५० निवारा शेडमध्ये पुनर्वसन केले आहे . तथापि मिरगावमध्ये अजूनही काही घरे सुस्थितीत असल्याने काही कुटुंब त्या ठिकाणी शेती कामासाठी जात असतात. सध्या पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत आहे .प
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हास्तरावर क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन संभाव्य भूस्खलन बाधित होणाऱ्या जागेचा आढावा घेतला. कोणी कुटुंब किंवा काही व्यक्ती तिथे राहत तर नाही ना याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते.
या सूचनांची तातडीने पालन करण्यासाठी पाटण तहसीलदार अनंत गुरव, प्रांत अधिकारी सुनील गाडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे यांनी भूस्खलन झालेल्या मिरगाव रात्रीच्या वेळी गाठले. गावामध्ये कोणीही व्यक्ती नसल्याची खात्री करून घेतली. काही घरे सुस्थिती बंद होती.संभाव्य भूस्खलन ठिकाणी किंवा मिरगावत कोणत्याही कारणांस्तव जाऊ नये असे आवाहन देखील सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
——————————————-
फोटो – भूस्खलन झालेल्या मिरगावला भेट देताना अधिकारी (छाया-अजित जगताप, पाटण)