भिलार : पाचगणी (ता.महाबळेश्वर) या जगप्रसीध्द शैक्षणिक केंद्रावर काल दोन अतिरेक्यांचा थरार पहायला मिळाला. पाचगणी -महाबळेश्वर मुख्य रस्त्याला लागुनच असणार्या किमीन्स स्कूलच्या इमारतीमध्ये दोन अतिरेकी घुसुन हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलीसांना मिळाली. सर्वजण भितीच्या छायेखाली होते. शालेय विद्यार्थी, कर्मचारी यांच्या चेहर्यावर मृत्यु समीप आल्याची भावना निर्माण झाली होती. सर्वत्र पळापळ सुरू झाली होती. लागलीच या शाळेच्या इमारतीला पोलीस, रेस्क्यु टिम, अॅन्टीटेररीस्ट ,बॉम्ब शोधक पथक अशा सुमारे 88 जवनांचा वेढा पडला. शाळेतील विद्यार्थीही भेदरलेले होते. अथक परश्रमानंतर आपले जिव धोक्यात घालुन जवानांनीं शाळेत लपलेल्या दोन अतीरेक्यांचा खातमा केला. पंरतु ही आपत्ती जोखीम कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षीक (मॉकड्रील) असल्याचे संागण्यात आल्याने सर्वांचा जिव भांडयात पडला.
देशात वाढत्या अतिरेक्यांच्या हल्लयांच्या घटना घडत असुन पाचगणीतही अशा हल्लयाची शक्यता वाटत आहे. या शहरात परदेशी पर्यटक व नागरीकांची नेहमी ये जा असते त्यामुळे असा हल्ला केव्हांही होऊ शकतो. आणि अशाच प्रकारची घटना मंगळवारी पाचगणीत घडली.

याबाबत अधीक माहीती अशी की किमीन्स स्कूलच्या इमारतीमध्ये दोन अतीरेकी घुसुन त्यांचा थयथयाट चालला असल्याची व विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याची खबर पाचगणी पोलीसंान फेानद्वारे मिळाली. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी वरीष्ठांशी सपंर्क साधुन परीस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण माहीती दिली. त्यानुसार तातडीने सर्व यत्रंणा कामाला लागली. यामध्ये पाचगणी पोलीस ठाण्याचे 14, भुईंजचे 10, मेढा 9, वाई 9, महाबळेश्वर 4 पोलीस कर्मचारी, क्वीक रॅपीड अॅक्शनचे 6 जवान, दंगा नियंत्रण शाखेचे 20, अॅन्टीटेरीरीस्ट विभागचे (एटीसी) चे सात आणि बाँब शोधक पथकाचे (बीडीडीएस) चे चार आणि एक श्वान असे एकूण 83 जवान व 6 पोलीस अधीकारी असे एकूण 89 जण कारवाईसाठी किमीन्स हायस्कूलच्या आवारात दाखल झाले. अँब्युलन्स डॉक्टर व कर्मचारी यंानाही पाचारण करण्यात आले. आत घुसलेले अतीरेक्यांकडे काय काय सामुग्री आहे याची माहीती नव्हती. पोलीस व शस्त्रधारी जवानांसह मोहीमेची व्युहरचना केली आणी ऑपेरशनला सुरूवात केली. आणि केंवळ अर्ध्या तासातच या पाच अतीरेक्यांना जिवंत पकडण्यात पथकाला यश आले. आणि हे अतीरेकी ऑपरेशन मोहीम सक्सेस करण्यात सर्वाना यश आले.
त्यांनतर अशा गुन्हावेळी नागरीक, शाळा प्रशासन, पोलीस यंानी काय करावे याबाबत माहीती दिली. या सर्व घटनेने पाचगणी शहरात वाढलेला पोलीसांचा ताफा पाहुन शहरात याबाबत जोरदार कुतुहल लागुन राहीले होते. काही तरी घडतय याची जाणीव नागरीकांना वाटु लागल्याने सर्वत्र चौकशी सुरू झाली होती. पंरतु या घटनेच्या पाठीमागे निमीत्त होते ते फक्त प्रात्यक्षीकाचे त्यामुळे सर्वांना हायसे वाटले.
ही मोहीम पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार, भुईंजचे सपोनी बाळासाहेब भरणे, मेढ्याचे पोलीस उपनिरीक्षक झांजुर्णे, वाईचे उपनिरीक्षक कदम, मुलाणी व बाँब शेाधक पथकाचे शिवाजी शिंदे व त्यांच्या सहकारी जवानांनी फत्ते केली.
याबाबत बोलताना नारायण पवार यांनी सांगीतले देशभरात अतीरेकी कारवायां होत असताना आपल्या शहरांनाही याचा धोका पोहचु शकतो त्यावेळी आपले रक्षण करणे, बाँब चा हल्ला, गोळ्यांचा होणारा हल्ला यातुन आपला बचाव कसा करावा? आणि इतरांचेही कसे प्राण वाचवावेत? तसेच सर्वसामान्य नागरीक म्हणून आपली काय भुमीका असावी? याबाबत माहीती दिली. जवानांनाही त्याच प्रशीक्षण असणे गरजेचे आहे त्यासाठीच या प्रात्यक्षीकाचे आयोजन पाचगणीत केले असल्याचे सांगीतले.
अशा प्रकारचे प्रात्यक्षीक सेंट पिटर्स हायस्कूलमध्येही घेण्यात आले. या प्रात्यक्षीकांला शहारातील नागरीक सेंट पिटर्स व किमीन्सचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यंानी सहकार्य केले.