पुरलेले सांगाडे काढणार्या करणार्या सफाई कर्मचार्याचा हृदय विकाराने मृत्यू
वाई : संतोष पोळ याने जे सहा खून करून ते मृतदेह ज्या ठिकाणी पुरण्यात आले त्या ठिकाणचे मृतदेह पोलिसांनी वाई नगरपालिकेच्या कर्मचार्यांकडून उत्खनन करून बाहेर काढले आहेत. एकाही मृत देहाची अवस्था ही उचलून घेण्यासारखी नव्हती. त्यांना बराच कालावधी झाला असल्याने त्यांचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले होते. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांना अतिशय गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत होता. त्या ठिकाणची परिस्थिती ही टेन्स असल्याने त्याचा ताण या कर्मचार्यांवर होता. नगरपालिकेचा कर्मचारी सुभाष विठ्ठलराव चक्के (49) हा कामावर असताना ताण सहन करू न शकल्याने त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. परंतु त्याच्यावर उपचार करण्यात येत असताना उपचारादरम्यान आज सकाळी 9.30 वाजता त्याचे निधन झाले. संतोष पोळने केलेल्या काळ्या कारनाम्याचा आणखी एक बळी गेला. संतोष पोळ या घटनेला जबाबदार आहे. तरी त्याच्यावर कर्मचार्याच्या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सुभाष चक्के हा नगरपालिकेत गेली चोवीस वर्षे सफाई कामगार म्हणून काम करीत होता. अतिशय प्रामाणिक काम करणारा कामगार म्हणून तो परिचित होता. संतोष पोळने केलेल्या खुनांचे सांगाडे काढल्याने त्याच्यावर दडपण आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकानी पालिकेकडून त्याच्या मुलाला कामावर घेण्याचे जोपर्यंत आश्वासन (पत्र) मिळत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह न हलविण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनी मध्यस्ती करून आ. मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाला तसे पत्र देण्यास भाग पाडले.तसेच पालिका प्रशासन जिल्हा अधिकार्यांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुभाष चक्के हे वाईतील गंगापुरी भागात सफाई करण्याचे काम करत होते.त्याच्यानंतर एक मुलगा, पत्नी व विवाहित दोन मुली असा परिवार आहे. वाई पालिका प्रशासनाला त्वरित आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्याचे समजते.