सातारा : सातारा नगर पालिकेच्या स्थायि समितीच्या सभेत अवघ्या अर्ध्या तासात पाऊन कोटीच्या जंबो 78 विषयांना मंजूरी देण्यात आली. तर एक विषय प्रलंबीत ठेवण्यात आला आहे. सातारा नगर पालिकेची आज स्थायी समितीची सभा अध्यक्ष विजय बडेकर यांच्या उपस्थितीत झाली.
यात माची पेठेतील अदालत वाडा पिछाडीस संरक्षक भिंत बांधणे, लोखंडे कॉलनी येथील अंतर्गत गटार दुरूस्ती, पाईप ड्रेनची कामे करणे, सातारा शहरातील महिला व मुलींना त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी ब्युटी पार्लर, कपडे शिवण व फॅशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण देण्याच्या खर्चास मंजूरी देणे, गुरूवार पेठेतील शकुनी गणेश मंदिरा समोरील चौक रस्ता डांबरीकरण करणे, तसेच सातारा नगर परिषदेमार्फत आयोजित राज्य महिला कब्बड्डी स्पर्धेसाठी येणार्या खर्चास मंजूरी देणे, अशा तब्बल पाऊण कोटी खर्चाच्या 78 विषयांना अवघ्या अर्ध्या तासात स्थायि समितीने मंजूरी दिली. यात एकात्मीक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा योजने अंतर्गत लाभार्थी सौ रूपाली रविंद्र होडे रा. रामाचा गोट, यांना घरकुल वाटप करणेबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी स्थायि समितीमध्ये हा विषय ठेवण्यात आला होता. मात्र स्थायि समितीने हा विषय तात्पुरता प्रलंबीत ठेवला आहे.