पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुप्रिया सुळेंनी टॅग केले आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात १५ डिसेंबरपर्यंत एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा केला होता .
“सेल्फी विथ खड्डा”
RELATED ARTICLES