Monday, May 19, 2025
Homeताज्या घडामोडीनरेंद्र पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार, माथाडी कामगारांनी दिले आश्‍वासन

नरेंद्र पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार, माथाडी कामगारांनी दिले आश्‍वासन

कराड ः शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कराड दक्षिण-उत्तरमधील विविध गावांना भेट दिली. येथील माथाडी कामगार, ग्रामस्थ व विविध माथाडी संघटनांशी संवाद साधला. यावेळी माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत नरेंद्र पाटील यांना प्रचंड बहुतांनी निवडून देऊन खासदार म्हणून दिल्ली पाठविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्रचारादरम्यान राजाचे कुर्ले गावास भेट दिली. यावेळी या गावांमधील माथाडी कामगारांचे दैवत अण्णासाहेब पाटील यांच्यासमवेत काम करणारे काही माथाडी कामगार त्यांना भेटले. येथील सर्व माथाडी कामगारांनी नरेंद्र पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार असल्याचे आश्‍वासन दिले. खोके उत्पादन असोसिएशनमधील काळे माथाडी कामगारांनी नरेंद्र पाटील यांना अण्णा साहेबांविषयी जुन्या गोष्टी सांगितल्या. अण्णासाहेब माथाडी कामगारांसाठी कशा पद्धतीने काम करायचे, मराठा समाजाला आरक्षण मागणीसाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिला आवाज उठवणारे माथाडींचे नेते अण्णासाहेब पाटील होते, यासह अनेक अण्णासाहेबांच्या जुन्या आठवणी सांगून ताज्या केल्या.
येथील सर्व माथाडी कामगार अण्णा साहेबांसोबत 1980 ते 1985 या कालखंडामध्ये काम करणारे कामगार होते. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत हे समजतात या जुन्या माथाडी कामगारांना नरेंद्र पाटील यांना कधी भेटाताहेत याची उत्सुकता लागली होती. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना पाठिंबा देईन असे सांगण्यासाठी त्यांना भेटण्याची उत्सुकता लागली होती. योगायोगाने नरेंद्र पाटील हे स्वतः प्रचारादरम्यान त्या गावांमध्ये गेले व या सर्व माथाडी कामगारांच्या इच्छा पूर्ण झाल्या. स्वतः नरेंद्र पाटील भेटायला आले त्यांना खूप आनंद झाला.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, कोका बाजार मध्ये बहुतांशी लोक हे पाटण भागातील होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अण्णासाहेबांनी स्वतःची बलिदान दिले. त्यानंतर आज आखेर मराठ्यांना आरक्षण देणारे कुठले सरकार आले नाही. परंतु आज एकमेव भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे आपणाला अशाच सहकार्‍याची गरज आहे. ते आपल्या गरजा पूर्ण करताहेत म्हणूनच मी युतीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवीत आहे. मला येत्या 23 तारखेला प्रचंड मतांनी निवडून देऊन लोकसभेत पाठवावे असे आवाहनही पाटील यांनी केले.
खोटे उत्पादन असोसिएशन मुंबईचे प्रतिनिधी धनंजय माने शेठ व कांदा बटाटा असोसिएशन बायका मार्केटचे प्रतिनिधी धनंजय पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत अण्णासाहेबांच्या बरोबरीने काम केलेले जगन्नाथ थोरवे, शंकर माने, रघुनाथ आदमाने, सुभाष माने, सुभाष माळी, बबन जगताप व बहुसंख्य माथाडी कामगार उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular