सातारा: बी.एस.एफ दिल्लीने 22 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये कालिदास लक्ष्मण हिरवे मु. पो. मांढरदेव, ता. वाई यांनी आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून 1 तास 3 मिनीट 27 सेकंद या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
हा जिल्ह्याचा बहूमान वाढविणार्या यशाबद्दल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज कालिदास हिरवेचा गौरव करुन ऑलिम्पीकमध्ये सुवर्णपद जिंकून देशाचा नावलौकीक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.
कालिदास हिरवे यांनी 35 राष्ट्रीय क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला असून या स्पर्धांमध्ये 15 पदके प्राप्त आहेत. त्यांची वैयक्तिक कामगिरी पुढीलप्रमाणे आहे. इंडियन ग्रान्ड प्रीक्स न्यु दिल्ली एप्रील 2017 मध्ये 3000 मी. (वेळ 8 मि.18 सेंकद), वरिष्ठ राष्ट्रीय गट मैदानी स्पर्धा चेन्नई सप्टेंबर 2017 मध्ये 5000 मी. (वेळ 14 मि.18 सेंकद), फेडरेशन कप वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा पतियाला जून 2017 मध्ये 10000 मी. (वेळ 29.57 सेकंद), बी.एस.एफ. दिल्ली हाफ मरेथॉन 22 ऑक्टोबर 2017 (वेळ 1 तास 3 मि. 27 सेकंद) व 22वी एशियन थलेटीक्स स्पर्धेत जुलै 2017 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. श्री. हिरवे हे भारतीय जीवन विमा निगम पुणे विभागात सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.