महाबळेश्वर : गेले अनेक महिने खंडित झालेली महाबळेश्वर-बारामती-वालचंदनगर एस.टी.बस सेवा शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या व प्रवाशांच्या सततच्या प्रयत्नामुळे दीपावलीचे औचित्य साधून नव्या जोमाने सुरु झाली.नुकतीच शिवसेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांच्या हस्ते बसची पूजा करून व महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापक डॉ.विक्रम देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सेवेच शुभारंभ करण्यात आला.
यावेळी यशवंत घाडगे, गोपाळ लालबेग, पत्रकार विलास काळे, संजय दस्तुरे, चिन्मय आगरकर , ओंकार दीक्षित , गणेश भांगडिया, आप्पा दगडू कोकरे, मोहन शिंदे, बापूराव खोमणे, संदीप देवकुळे, बी.टी.वारे, चोरगे मामा, राजा गुजर, संदीप शिंदे, राहुल शेलार, सुरज गाडे, अंकुश उलालकर, गायकवाड गुरुजी, के.बी.धुमाळ , महेश शिंदे, संदीप गाढवे, मोहन सुपेकर, चालक पी.के.चव्हाण, वाहक एम.एल.दगडे, दिलीप नवघाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेले अनेक वर्षे महाबळेश्वर आगारातून महाबळेश्वर -बारामती -वालचंदनगर एस .टी.बस सेवा कायम स्वरूपी सुरु होती मात्र गेले काही महिन्यापासून हि सेवा बंद झाली होती. हि बससेवा बंद झाल्याने महाबळेश्वर हून बारामती, वालचंदनगर परिसरातील प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत होती. हि बस सेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी परिसरातील प्रवाश्यंचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी सातत्याने मागणीची निवेदने एस.टी.च्या वरिष्ठापर्यंत पाठविली जात होती मात्र या न त्या कारणाने ती सुरु होत नव्हती.
राज्यात परिवाहन खाते शिवसेने कडे असल्याने तसेच परिवाहन मंत्री ना.दिवाकर रावते असल्याने अखेर या प्रवाशांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांना देवून या परिसरातील प्रवाशांची होणारी कुचंबणा कथन केली. त्यांनी हि बाब परिवहन मंत्र्यांच्या कानावर घातली. तसेच एस.टी.च्या वरिष्ठाशी संपर्क केला.अखेर त्याला यश येवून दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हि बस सेवा महाबळेश्वर आगारातून सुरु करण्यात आली.
हि बस महाबळेश्वर आगारातून दुपारी साडेबाराच्या सुमारास निघत असून ती वाई, वाठार, लोणंद, नीरा, वडगाव, मालेगाव, बारामती करून मुक्कामाला वालचंदनगरला सायंकाळी साडे सहा च्या सुमारास पोहोचते. दुसर्यादिवशी हीच बस वालचंदनगर येथून सकाळी पावणे सहा च्या सुमारास निघून ती सव्वाअकराच्या सुमारास महाबळेश्वर येथे पोहोचते.
खंडित बससेवा पुन्हा सुरु करून या परिसरातील प्रवाशांची सोय केल्याबद्धल परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते साहेब तसेच शिवसेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजेश उर्फ बंडा कुंभारदरे, महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापकडॉ.विक्रम देशमुख यांचे परिसरातील प्रवाशांनी आभार मानले आहेत.