Saturday, March 22, 2025
Homeठळक घडामोडीनैसर्गिक आपत्तीचा सामना करायला पालिका प्रशासन कटीबध्द आढावा बैठकीत रघुनाथराजे नाईक यांची...

नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला पालिका प्रशासन कटीबध्द आढावा बैठकीत रघुनाथराजे नाईक यांची माहिती

फलटण  :  नैसर्गिक  आपत्तीचा सामना करायला नगर पालिका प्रशासन कटीबध्द आहे तसेच या आपत्तीचा विमोड करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही असे  आश्वासन बांधकाम सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले ते आज नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या साथीच्या रोगासंबंधी घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते,यावेळी नगराध्यक्षा नीता नेवसे, सिव्हील सर्जन डॉ. भगवान पवार, डॉ.श्रीकांत भोई, डॉ. अविनाश पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार जाधव, विरोधीपक्ष नेते समशेरसिंह ना.निंबाळकर इ.मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले,सध्या साथीच्या रोगांमुळे फलटण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा वेळी प्रबोधन करण्याची गरज आहे.या प्रबोधनासाठी तसेच या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाचे तज्ञ 8 दिवस फलटण शहरातील घरोघरी जाऊन तपासणी करणार असल्याची माहिती यावेळी दिली.तसेच सत्ताधारी व विरोधकांनी एकञ येऊन या नैसर्गिक  आपत्तीचा सामना करणे गरजेचे आहे.तसेच डेंगुमुळे झालेल्या बांधवाचा मृत्यु ही खुप निंदणीय बाब असुन येत्या 8 दिवसाच्या सर्व कर्मचार्‍यांचा सुट्या रद्द करुन सर्व कर्मचार्‍यांना कामावर लावण्याचे आवाहन यावेळी नगराध्यक्षांना केले.
डॉ.श्रीकांतभोई म्हणाले,डेंगुच्या डासाला डेबायटर असे म्हणतात.डेंगुची उत्पत्ती थांबवणे गरजेचे आहे,साठवलेले पाणी ओतुन देणे, सर्व लोकांना आपण एक दिवस ड्राय डे पाळा असे आवाहन करा.स्वच्छ पाणी पिणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फलटण शहर व परिसरात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहरातील काही भागात पाणी साठल्याने किंवा सततच्या पावसाने दलदलीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेने दि. 7 आक्टोंबर पासून विविध उपाय योजना केल्याचे निदर्शनास  आणून देतानाच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही गतसप्ताहात आपल्या निवासस्थानी नगर परिषद, आरोग्य खाते आणि शहरातील काही डॉक्टर्स यांना निमंत्रित करुन शहरातील डेंग्यू, चिकन गुणीया, गोचिड ताप आदी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याच्या घटनांबाबत माहिती घेवून या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाय योजना करण्याच्या स्पष्ट सूचना सर्वसंबंधीतांना दिल्याचे नगराध्यक्षा सौ. नेवसे यांनी निदर्शनास आणून दिले. साथीच्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी नगर परिषदेचे 50 अधिकारी, कर्मचारी आणि उपजिल्हा रुग्णालयातील 22 अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून संपूर्ण फलटण शहरात घराघरात जावून सर्वेक्षण करण्यात आले ज्याठिकाणी पाणी साठविलेल्या टाक्या, हौद, रांजण वगैरेमध्ये साथीच्या रोगाच्या आळ्या आढळून आल्या त्याठिकाणी पाणी साठे ओतून देण्यात आले जेथे पाणी ओतून देणे शक्य नव्हते तेथे अबेट केमिकल टाकून त्यामधील साथीच्या आजाराच्या आळ्यांची वाढ रोखण्यात आली त्याचबरोबर शहराच्या सर्व भागात फॉगींग मशिनद्वारे धूर फवारणी करण्यात येत असून त्यासाठी सध्या नगर पालिकेकडे उपलब्ध असलेली 5 फॉगींग मशिन वापरण्यात येत आहेत आणखी 6 फॉगींग मशिन खरेदी करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा सौ. निता नेवसे यांनी निदर्शनास आणून दिले.
डॉ.अविनाश पाटील म्हणाले,प्रशासनाच्या या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी थोड्या प्रमाणात यश प्राप्त झाले.परंतु थोड्या अडचणी निर्माण होत असल्याने ज्याठिकाणी या साथीच्या रोगांचा फैलाव जास्त आहे त्याठिकाणी ओपोडी केंद्र सुरु करणार असुन यामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण कमी होईल.
यावेळी बैठकीस नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित  होते.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular