कोरेगाव ः सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता कोरेगाव येथे भंडारी ग्राउंड, डी. पी. भोसले कॉलेज समोरील मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष व भाजप प्रदेश सरचिटणीस मा.ना.डॉ.अतुल भोसले, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रवक्ते भरत पाटील, शिवसेनेचे नेते पुरूषोत्तम जाधव, भाजप नेते महेश शिंदे, मनोजदादा घोरपडे, शिवसेना नेते रणजितसिंह भोसले, रामकृष्ण वेताळयांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कोरेगाव येथे डी. पी. कॉलेज समोरील मैदानावर बुधवार दि. 17 एप्रिल रोजी दु. 2:30 वा. होणार्या या सभेस शिवसेना-भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची कोरेगावात सभा
RELATED ARTICLES