Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीउदयनराजेंच्या प्रचारासाठी राज साहेब आज सातार्‍यात

उदयनराजेंच्या प्रचारासाठी राज साहेब आज सातार्‍यात

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची सातारा नगरीत बुधवार दि. 17 एप्रिल रोजी सांयकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रेल्वे इंजिन सातार्‍यातील गांधी मैदानावर धडाडणार आहे. या सभेला लोकसभा निवडणुकीत फ्री हिटवर राजसाहेब कोणाच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी माणसांची अस्मिता जपणारे मनसे सैनिक यांनी या सभेसाठी जोरदार तयारी केली असून छत्रपती शिवरायांचे वंशज श्री. छ. उदयनराजे व राजसाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्सेही ऐकण्यास मिळणार आहेत. त्याचबरोबर राजकारणातील जोड गोळी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर ठाकरी भाषेत होणारे भाष्य ऐकण्यासाठी सातारकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. युतीने याठिकाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबाबत ठाकरे कोणती नवीन उपमा देणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा शहरात मनसेच्या निर्मितीपूर्वी राज ठाकरे यांनी मान्यवरांची भेट घेवून त्यांचे मनोगत जाणून घेतले होते. त्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली होती. सध्या लोकसभेला मनसेनी उमदेवार दिलेला नाही. त्यामुळे फ्रि हिट मिळाला असून षटकार, चौकारांची आतिषबाजी उमेदवार श्री. छ. भोसले यांच्या मताधिक्यात अधिक भर पाडेल असा विश्‍वास मनसेेचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी धैर्यशील पाटील, राजू केंजळे, युवराज पवार यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
या जाहिर सभेला गांधी मैदानावर किमान 20 हजार काँग्रेस आघाडीचे समर्थक उपस्थित रहाणार असल्याची शक्यत गृहीत धरून मोठा पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सभेचे थेट शहरातील प्रमुख चौकात प्रोजेक्टर लावून प्रेक्षेपण केले जाणार आहे. सातार्‍यातील जाणकार मंडळी ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ते सभेला संबोधीत करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular