Saturday, January 24, 2026
Homeठळक घडामोडीमाणदेशी जनतेसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट ; सत्तर गावांना टँकरने पाणीपुरवठा ;...

माणदेशी जनतेसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट ; सत्तर गावांना टँकरने पाणीपुरवठा ; विहिरी कोरड्या पडू लागल्या

म्हसवड (विजय भागवत) : माण तालुक्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून माणदेशी जनतेसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होतं चाललाय असून ज्या ढाकणी तलाव्यातील विहिरी वरून तालुक्यातील सुमारे सत्तर गावांना साठ टॅकरद्वारे लाखो लिटर पाणीपुरवठा केला जातोय ती विहिर कोरडी पडू लागल्याने सबंधीत गावातील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली असून ढाकणी तलाव्यात उरमोडीचे तात्काळ सोडले नाही तर तालुक्यातील अनेक गावातील जनतेवर गावं सोडण्याची वेळ येईल अशी भिती माणदेशी जनता व्यक्त करत आहे.
माण तालुक्यात 105 महसुली गावे आहेत. माण तालुक्यातील जनतेच्या दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे. यापुर्वीचे माणदेशवासियांनी अनेक दुष्काळ पाहिले,ज्या ज्या वेळी दुष्काळ पडला त्या त्या वेळी शासन प्रशासन दुष्काळावर मात करण्यासाठी पशुधन वाचवण्यासाठी बळीराजाच्यामदतीला धावून येत होते.या वर्षी ऑक्टोबर महिण्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील सात महिने माणची जनता दुष्काळी झळा सोसत आहे. पिण्याच्या पाण्याचे टॅकर सुरू करावेत म्हणून अनेक गावे प्रस्ताव करत होते मात्र सहजासहजी टँकर सुरू केले गेले नव्हते . हजारो जनावरं चार्याअभावी दावणीवर तडफडत असताना आजही शासनाने चारा छावणी सुरू केली नाही. ही खुप मोठी शोकांतिका आहे. मजुराला तर कोणी गृहीतच धरत नाही. मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. तर माणसा सह जनावर पशु पक्षी पाण्यासाठी भटकंती करत आहेत.
सध्या दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली असताना माण तालुक्यातील ढाकणी तलाव्यात मागील दोन महिन्यांपूर्वी उरमोडीचे पाणी सोडले होते.त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेला काही काळ दिलासा मिळाला होता. या तलाव्यात वडजल गावासाठी भारत निर्माण योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी विहिर पाडली आहे. सध्या ती विहिर अधिग्रहण केली असून त्या विहिरी तून तालुक्यातील कुकुडवाड, पुकळेवाडी, वळई, विरळी,ढाकणी, दिवड, पानवन, जांभुळणी, गंगोती, काळचौंडीत, वरकुटे-मलवडी, पळसावडे, देवापुर, पुळकोटी, रांजणी, धामणी,पर्यंती, भाटकी, संभूखेड, धुळदेव, हिंगणी,कारखेल, इंजबाव, खडकी, हवलदारवाडी, वाकी, वरकुटे, मोही, मार्डी, आदि गावांना दररोज लाखो लिटर पाण्याचा पुरवठा टॅकर द्वारे करण्यत येत आहे.
सध्या तालुक्यातील आंधळी, राणंद, पिंगळी, राजेवाडीसह ढाकणी तलाव कोरडं पडले आहेत.परिणामी ढाकणी तलाव्यात उरमोडीचे मागील दोन तीन महिन्यापूर्वी सोडलेल्या पाण्याची पातळी घटका मोजू लागल्याने तलाव्यात असलेली विहिर हा टॅकर विहिरी वर उभे राहू लागले आहेत. दररोज विहिरीतील पाण्याची पातळी खाली जात असल्याने दररोज पाणीपुरवठा करणारी पाण्यातील विद्युत मोटर रोजच पाण्यात खाली सोडण्याची कसरत करावी लागत आहे. परिणामी याचा फटका टॅकरवर अवलंबून असलेल्या गावांवर होत आहे. अनेक गावांना आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही.रात्र दिवस टॅकरची वाट पहावी लागत आहे.
येत्या काही दिवसात उरमोडीचे पाणी ढाकणी तलाव्यात सोडले नाही तर पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी ठणठणीत पडल्या शिवाय राहणार नाही. परिणामी तालुक्यातील अनेक गावांसमोर पाण्याचे संकट उभे राहणार आहे.शासन प्रशासन निवडणुकीत गुंतलेले असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जनता करत असून, तातडीने उरमोडीचे पाणी ढाकणी तलाव्यात सोडले नाही तर तालुक्यातील अनेक गावातील जनतेवर गावं सोडण्याची वेळ येईल अशी भिती माणदेशी जनता व्यक्त करत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular