Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीहरहर महादेवच्या जय घोषात मुंगी घाटातून मानाच्या कावडी

हरहर महादेवच्या जय घोषात मुंगी घाटातून मानाच्या कावडी

नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची उपस्थिती
म्हसवड : रानरणत्या उन्हात डोंगर कपारीच्या मधुन अवजड अशा कावडी घेवुन म्हाद्या धाव म्हाद्या पाव, हर हर महादेवच्या जय घोष करत शिव भक्त आज शिखर शिंगणापुर येथील अवघड असा मुंगी घाट सर करत मानाच्या कावडी मधील जलाने शिवलिंगाला जलाभिषेक घालुन आज यात्रेची सांगता झाली दरम्यान मुंगी घाट सर करताना जो थरार आणि नेत्रदिपक सोहळा असतो तो पाहण्यासाठी यावेळी लाखो भाविक उपस्थित होते.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापुर येतील महादेवाची कावड यात्रा शिव मंदीरात गुडी उभारुन या यात्रेला सुरुवात झाली होती.हळदीच्या कार्यक्रम पार पडल्या नंतर ध्वज बांधण्यात आली त्यानंतर इंदौरचे काळगौडा राजे यानी काल शिव पार्वतीचे दर्शन हि घेतले त्यानंतर अवघड अशा मुंगी घाटातुन कावडी वर चढण्यास सुरुवात होते त्यानुसार आज कावडी मुंगी घाटातुन वर येवु लागल्या.
शिखर शिंगणापुरचा डोंगर हा सह्याद्रीच्या डोंगर रांगातील अखेरच्या टप्यातील म्ह्णुन ओळखला जातो अती उंच असलेला मुंगी घाट या डोंगरात आहे खळद, एकतपुर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ या पंचक्रोशी मधुन मोठ्या प्रमाणात कावडी येतात खळद येथील निवृत्ती महाराज खळदकर सासवड येथील काशीनाथ कावडे संत तेली भुतोजी बुवा या मानाच्या कावडी कोथळे भागात आज दुपारी पोहचल्या आणि कावडी पुढे भाविका कडुन फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.कावडीना ठिक ठिकाणी ओवळण्यात येत होत तांब्याचे दोन हंडे त्यावर उंच असा झेंडा त्याला विविध रंगाचे कपडे लावुन सजवण्यात आल होत कावड समांतर राहण्यासाठी त्याला सर्व बाजुनी दोर्या हि लावण्यात आल्या होत्या हळु हळु कावडी पुढे सरकत होत्या अनेक लहान लहान कावडीनी चढाई सुरु केली होती मोठ्या उत्साहात पहिला टप्पा कावडीनी चढल्यावर सर्वत्र आनंद साजरा केला जात होता दुसरा टप्पा ही भर उन्हात सरसर चढला जात होता हे दोन टप्पे थोडे कमी उंचीचे असल्याने लवकर सर झाले हि चढाई सुरु होती उंच असा डोंगर सुध्दा हे भाविक कावडी घेवुन कड्या कपारीत पाय खुतवुन महादेवाचा धावा करत वर येत होते या शिव भक्तांच्या अंगातुन घामाच्या धारा लागलेल्या होत्या मात्र हे सगळे विसरुन देवाच्या भेटीसाठी सर्व जन आसुसलेले होते त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संत तेली भुतोजी बुवा यांची कावड मुख्य मार्गावर दाखल झाली आणि प्रत्यक्ष त्या कावडीने अवघड असा मुंगी घाटाचा प्रवास सुरु केला यावेळी हर हर महादेव चा गजर सुरु होता भर दुपारी या डोंगरातुन लाखो भाविक हा थरार पाहण्यासाठी जागा मिळेत तिथे बसुन होते अनेक भाविक अती उत्साही होवुन डोंगराच्या टोकांवर बसुन पाहत होते मात्र सुरक्षेच्या कारणा वरुन पोलीस वारंवार त्याना सुचना देत होते.
सायंकाळी उशीरा दोरखंड आणि मानवी साखळीच्या आधारे या कावडी या मुंगी घाटातुन वर येतात यावेळी कावडी बरोबर आसणारा प्रत्येक भाविक महादेवाचा धावा करत असतो एकमेकांच्या हातात हात घालुन मानवी साखळी द्वारे हा घाट मोठ्या उत्साहात चढला जात होता पाच वाजे पर्यत अनेक कावडी वर आल्या होत्या सायंकाळी उशीरा मानाची संत तेली भुतोजी बुवा यांची कावड दुसर्या टप्यावर आली होती अंधार होवुन सुध्दा हि कावडी पाहण्यासाठी भाविक थांबुन होते अखेर रात्री उशीरा या सर्व कावडी मोठ्या शक्ती भक्ती आणि उत्साहात मुंगी घाट सर करुन वर आल्या आणि कावड मिरवणुकी पुढे ढोल ताशे सनई हालगी या वाद्यांचा गजर कडकडात सुरु होता कावड खांद्यावर घेवुन नाचवली जात होती सर्व तल्लीन होऊन नाचत होते कावडी महादेवाच्या मंदीरात दाखल होवुन कावडीमधुन निरा नदीसहसह पंचनद्यांच्या आणलेल्ल्या जलाने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला.कावडी मुंगी घाटातुन वर चढुन आल्यावर राजमाता कल्पनाराजे यांच्या उपस्थितीत कावडी धारकांचे स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे स पो नि प्रविण पाटील त्याच बरोबर बाँब शोधक पथकाने सर्वत्र शोध मोहिम राबवली .सर्वत्र चैतन्याचे वातावरण होतं.स्वागत साठी माणखटावचे विभागीय आधिकारी दादासाहेब कांबळे,विभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे,शिंगणापूर सरपंच अभय मेंनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, दीपकराव तंडेबडवे, आनंद बडवे,धनंजय कवडे,पोलिसपाटील संतोष बोराटे, वीरभद्र कावडे, जाधव आण्णा, चारूदत्त तोडकर, आदींनी शिंगणापूर डोंगर माथ्यावर मांनाच्या कावडींचे स्वागत केले.
यंदाच्या शिंगणापूर यात्रेकरूंच्या सोयी सुविधा पुरविण्यामध्ये प्रशासनासनेही काहीसं दुर्लक्ष केले असून यात्रा गांभीर्याने प्रशासन यंत्रणेने दखल न घेतल्याने शिंगणापूर यात्रेत भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले त्यामुळे यंदाच्या शिंगणापूर यात्रेवर निवडणूक आणि दुष्काळाचे सावट जाणवत होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular