म्हसवड: दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या चेहर्यावर कायमचे हास्य फुलविण्यासाठी शिक्षक व वर्ग मित्रांनीही आज जलसंधारणाच्या कामासाठी हातात हात दिला. कोल्हापूरच्या श्री जोतिर्लिंग पब्लिक स्कुलने आज गोंदवले खुर्द (ता.माण)येथे श्रमदान तर केलेच, शिवाय या कामासाठी दहा हजारांचा निधी देऊन म एक दिवस माणुसकीचा मसत्यात उतरवत गोंदवलेकरांची मने जिंकली.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गोंदवले खुर्द ने सहभाग घेतला असून 8 एप्रिल पासून याचे काम सुरु झाले आहे कामाच्या पहिल्या दिवसापासून दररोज सुमारे 1500 लोक या कामावर श्रमदान करत आहेत. तेव्हा पासून एक खूप मोठं काम पूर्ण करण्याचा मानस गोंदवलेकरांनी केला होता त्याप्रमाणे हे काम सुरू होत. ते पाहुन ज्योतिर्लिंग पब्लिक स्कुल माले ता पन्हाळा जि कोल्हापूर येतील या शाळेने माण तालुक्या मधील ही दुष्काळजन्य परिस्थिती जवळून पाहिली आहे. माण तालुक्यातील गोंदवले खुर्द गोंदवले बुद्रुक पिंगळी कचरेवाडी लोधवडे या गावातील सुमारे 30 विद्यार्थी येते शिक्षण घेत असून त्यांचे पालक दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःहून घेत असलेली मेहनत बघून आपण सुध्दा समाजाचं काही तरी देणं लागतो आहे.
यामुळे आपला सहभाग यात नोंदवणे गरजेचे आहे या वृत्तीने प्रेरित होऊन शाळेतील सर्व शिक्षकांच्या पुढे हा विषय मिटिंग मध्ये सांगितला आणि एक दिवस आपण ही येते श्रमदान करायला जाऊ असे शिक्षक म्हणाले व यातून एक दिवस माणुसकीचा हे घोष वाक्य तयार करण्यात आलं.
यानुसार माणुसकीच्या हाकेला साद देत कोल्हापूर ज्योतिर्लिंग पब्लिक स्कुल स्पोर्ट अकॅडमी या शाळेने विध्यार्थी आणि आपल्या स्टाफ सह गोंदवले खुर्द येते येऊन ग्रामस्थांच्या बरोबर सकाळी सात वाजता कामावर हजर झाले.
ग्रामस्थ करत असलेल्या कामाप्रमाणे या चिमुकल्या हातानी हातात पेन धरण्याऐवजी आज खुद्द टिकाव आणि फावड व साथीला घमेल घेऊन कामाला सुरुवात करत बघता बघता दोन तासात महिला शिक्षिकांनी सी सी टी पिचिंग करण्यासाठी दोन ट्रॉली दगड गोळा केले तर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दोन तासात 30 फूट लांब 2 फूट रुंद आणि 1 फूट खोल अशी सी सी टी काढत श्रमदान केले.
याचे गोंदवलेकरांनी खूप कौतुक केले मुंबईकर मंडळींनी यामुलांचा गौरव करत त्यांना त्यांच्या भविष्यात लेखणी चांगली व्हावी यासाठी चांगल्या दर्जाचे पेन भेट दिले.
माण तालुका दुष्काळी असला तरी माणदेशी माणूस संकटावर मात करताना मागे पुढे पाहत नाही या बद्दल आम्हाला कौतुक वाटत म्हणून गोंदवले ग्रामस्थांनी आम्हाला श्रमदान करायची संधी दिली त्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
म्हसवडला शिक्षक व वर्गमित्रांचा जलसंधारणाच्या कामासाठी हातात हात
RELATED ARTICLES