सातारा : जकातवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत संशयीत धीरज विजय शेळके याने गाडीचा कर्कश्श हॉर्न वाजविला म्हणून सुधीर विलास सावंत (रा. जकातवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, किरकोळ वादावादी झालेला राग मनात धरुन धीरज विजय शेळके, रोहीत सुरेश निंबाळकर व त्याचे अनोळखी साथीदार नाव पत्ता माहित नाही यांनी सायंत याच्या घरासमोर येवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबतही भादवि कलम 307, 34, प्रमाणे संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहा. पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अण्णासाहेब मांजरे, पो. उपनिरीक्षक नारायण गिते, पो. हवा. दादा परिहार, पो. ना. राहुल शिंदे, पो. ना. सुजित भोसले, उत्तम कोळी, रमेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
गाडीचा हॉर्न वाजवल्यावरुन एकास मारहाण
RELATED ARTICLES

