कराड ः कराडमध्ये येत्या 24 ते 28 नोव्हेंबरअखेर कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून होणा़र्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगीक व पशुपक्षी प्रर्दशनासाठी कृषी व इतर शासकीय विभागाच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल उभारण्यात यावेत, असे आदेश देत महाराष्ट्राभरामधील कृषी विद्यापीठांचे स्टॉलही यावेळी सहभागी व्हावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर प्रर्दशनामध्ये यशस्वी शेतकर्यांच्या यशोगाथा व कमी पाण्यामधील प्रगत शेतीचे धोरण सांगणार्या चित्रफिती लोकांपर्यंत पोहचविल्यास शेतक़र्यांच्या स्वालंबनाला वाव मिळेल. हा देखील प्रयत्न प्रर्दशनात व्हावा.
प्रर्दशनामध्ये सर्व शासकीय विभाग सुसज्ज ठेवा, जेणेकरुन प्रदर्शनाचा लौकिक टिकेल. असे मत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केले. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने येत्या 24 ते 28 नोव्हेंबरअखेर होणा़र्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगीक व पशुपक्षी प्रर्दशनाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, कराड पंचायत समितीच्या सभापती शालन माळी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. चांगदेव बागल, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमृतराव पवार, उपसभापती आत्माराम जाधव व सर्व संचालक, तसेच प्रदर्शनाचे व्यवस्थापन नव्याने हाती घेतलेले स्मार्ट एक्स्पो ग्रुपचे चेअरमन सोमनाथ शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, शेतक़र्यांनी संशोधीत केलेले संशोधन व अवजारे या प्रर्दशानामध्ये येणाऱया लोकांना पाहता यावी, याकरिता आयोजकांनी खास दालनाची व्यवस्था करावी. तसेच कमी पाण्यात शेती करता येईल याचेही मार्गदर्शन करणारी माहिती व त्या पध्दतीचे स्टॉल उभारावेत. पथनाट्ये व चित्रफितीच्या माध्यमातून अधुनिक शेतीची जनजागृती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. यावेळी त्यांनी प्रर्दशन कालावधीत येणारया नागरिकांना स्वच्छ पाणी व स्वच्छता ठेवण्याच्या कराड नगरपालिकेस सूचना दिल्या. वहातूक व कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवून प्रर्दशन यशस्वी व्हावे. यासाठी पोलिस यंत्रणेने सतर्क रहावे. तसेच आरोग्य विभागाकडून शेतक़र्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरासाठी दालन उभारावे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
जितेंद्र शिंदे म्हणाले, सर्व शासकीय योजनांचे विविध स्टॉल प्रर्दशनामध्ये सहभागी होतील. या संदर्भात कृषी विभागास आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. बाजार समितीचे संचालक महादेव देसाई व अशोकराव पाटील-पोतलेकर यांनी दरवर्षी बाजार समिती कृषी प्रदर्शन भरवते. व त्यादृष्टीने आखलेल्या संयोजनाचा आढावा आमच्याकडून तयार आहे, असे सांगितले. व संबंधीत विभागांच्या अधिकाऱयांसह कर्मचाऱयांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विविध विभागांचे स्टॉल उभारल्यास प्रदर्शनाच्या लौकिकात वाढ होईल, असेही ते म्हणाले. हिम्मत खराडे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हे प्रदर्शन घेतल्यामुळे कराडचा लौकिक राज्याबाहेर पोहचला आहे. प्रर्दशनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्नशील राहील. चांगदेव बागल यांनी प्रर्दशनामध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने विविध स्पर्धांच्या आयोजनामधील सातत्य राखले जाणार आहे. त्यानुसार पशुपक्षी व भाजीपाला तसेच पिकस्पर्धांचे देखणे आयोजन केले जाईल.
प्रर्दशनाचे व्यवस्थापन नव्याने हाती घेतलेले स्मार्ट एक्स्पो ग्रुपचे चेअरमन सोमनाथ शेटे यांनी जिल्हाधिकार्यांना प्रर्दशनाच्या तयारीची माहिती देताना सांगितले की, 400 हून अधिक स्टॉल प्रर्दशनामध्ये सहभागी होणार असून, यंदा भव्यदिव्य स्वरुपात हे प्रर्दशन यशस्वी होईल. त्यासाठी प्रशासनाकडून ज्या-ज्या पध्दतीचे सहकार्य लागेल, ते पुरविण्यासाठी सहकार्य करावे. शेवटी बाजार समितीचे प्रभारी सचिव बी. डी. निंबाळकर यांनी आभार मानले.