फलटण : तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारतीय जानता पार्टीला मिळालेले यश भविष्यात सक्षम नेतृत्वास उभारी देणार असुन सामान्य जनतेने देऊ केलेली राजकीय जबाबदारी नि:पक्षपणे पार पाडणार असल्याचे भाजपाचे युवा नेते सह्याद्री कदम यांनी एका प्रसिध्दी पञकातुन स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहता तालुक्यातील जनतेला राजकीय बदल हवा असल्याचे दिसुन येत आहे.24 ग्रामपंचायतीत झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधार्यांना कोणत्याच ठिकाणी स्पष्ट बहुमताने सत्ता काबीज करता आली नाही.तालुक्यातील राजकारण बदलत असुन जनताच आता स्पष्टपणे विरोधात उभी राहत असल्यामुळे विरोधकांना आपली भुमिका स्पष्टपणे मांडणे व त्याच्याशी ठाम राहणे आता काळाची गरज झाली आहे.गिरवी सह ,तालुक्यातील चव्हाणवाडीमध्ये सरपंच सह 5 सदस्य,चौधरवाडीमध्ये 3 सदस्य,आदर्कीमध्ये सरपंचसह 5 सदस्य भाजपा स्वबळावर तर काही ठिकाणी मित्रपक्षांनासोबत घेऊन विजय खेचुन आणला आहे.तर सोमंथळी ग्रामपंचायतीत 4 सदस्य निवडुन आले तर सरपंचपदाचे उमेदवार 118 अशा अल्प मताने पराभुत झाल्याने जनसामान्यांना भयमुक्त वातावरण व आर्थिक स्थिरता देण्यासाठी सक्रिय भुमिका घेणार असल्याचे सह्याद्रीभैय्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात भाजपा नेतृत्वाविरोधात सुरु असलेली चर्चा ंबिनबुडाची असुन राजकारणात कोणत्याही एका समाजाची मक्तेदारी नसते तर मतदारांचा विश्वास व समाजातील काम उमेदवारांना विजयी करत असतो.सर्वसामान्य जनतेच्या हिताची भुमिका घेणार्या भाजपाच्या नेतृत्वामुळे तालुक्याच्या राजकारणात संधी मिळाली आहे.त्यामुळे जनतेने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी केंद्र व राज्य सरकाररच्या मदतीने ग्रामीण भागात मजबुत रस्त्यांचे जाळे,जलसंधारणांच्या कामांना गती,जुन्या तलावांची दुरूस्ती सह पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी ठिबक सिंचन योजना,शेतकरी ते ग्राहक बाजार पेठेला चालना देण्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहन,शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अशा ठळक गोष्टींना प्राधान्यक्रम देऊन तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
जनतेने देऊ केलेली राजकीय जबाबदारी नि:पक्षपणे पार पाडणार : कदम
RELATED ARTICLES