अकोला : अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 33 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत ड्रायव्हिंग सीटवर बसले .
अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत गाडी चालवत आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर दिगंबर ठक मागे बसलेत, असं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं. आपल्या शासकीय निवास्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयालापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दिगंबर यांना आपल्या जागेवर बसविले. यावेळी झालेल्या सेवानिवृत्ती समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कुटुंबीयांसह सन्मानित केलं. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे त्यांच्या अशा प्रकारच्या कामगिरीसाठी प्रसिध्द आहेतच. सातार्यातही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी असे आगळे-वेगळे कार्यक्रम राबवले होते.
अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला चालकाचा अनोखा सन्मान….
RELATED ARTICLES