वाई : वाई नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून गाठी-भेटी, परिचय देणे, नामांकन दाखल करणे झाले असून खर्या अर्थाने मुख्य प्रचाराला आज गणपतीच्या आर्शिवादाने सुरुवात करण्यात आली. किसनवीर कारखान्याचे चेअरमन -मदन (दादा)भोसले व आत्माराम बापू नायकवडी यांच्या हस्ते महागणपतीची आरती करून व श्रीफळ वाढवून वाई नगरपालिकेच्या निवडणुकीचा वाई विकास महाआघाडीच्या प्रचाराचा सोमवारी सकाळी दहा वाजता शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व उमेदवारांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी प्रताप गड उत्सव समितीच्या निमंत्रक- श्रीमती विजयाताई भोसले, आरपीआय चे जिल्हाअध्यक्ष- अशोक (बापू) गायकवाड, रशीद भाई बागवान, डॉ. चंद्रकांत शिंदे, राजेंद्र कासार, सयाजी पिसाळ, अरविंद कोरडे, रतनशेठ शिंदे, लालसिंग जमदाडे, कुमार तांबेकर, महाआघाडीचे अध्यक्ष- शेखर शिंदे, उपाध्यक्ष- अविनाश फरांदे, कार्याध्यक्ष- विवेक पटवर्धन, सचिव- विराज शिंदे, सहसचिव -सचिन घाटगे, कोषाध्यक्ष- विकास शिंदे, प्रचार प्रमुख- काशिनाथ शेलार, चेतन मोरे, सदस्य- जितेंद्र गांधी, अजित खामकर, आबासाहेब सूर्यवंशी, देवानंद शेलार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार-सौ. प्रतिभा शिंदे, व सर्व प्रभागातील नगरसेवक उमेवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रचाराचा शुभारंभ करताना भोसले म्हणाले, वाई शहराला सांस्कृतिक, ऐतिहासिक बैठक असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणार्या वाई शहराचा विकास करीत असताना दूरदृष्टीची गरज आहे. ती दूरदृष्टी ठेवूनच वाईतील सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून त्यांची एकत्र मोट बांधून त्यांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास साधणार आहोत. आम्ही तो नक्कीच करून दाखवू ..! परंतु त्यासाठी वाई विकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. शहराचा कायापालट करण्यासाठी महाआघाडीला साथ द्या. अशी ग्वाही मदन (दादा) भोसले यांनी यावेळी बोलताना दिली.
वाईच्या महागणपतीला श्रीफळ वाढवून महाआघाडीचा प्रचाराचा शुभारंभ
RELATED ARTICLES