औंध : औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या औंध कलामंदिर येथे सकाळच्या प्रसन्न उत्साही वातावरणात आ.प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दिपपर्जवल्लन करून शिवानंद स्वामी प्रतिष्ठानच्या 76व्या संगीत महोत्सवास स्वरमयी वातावरणात प्रारंभ झाला.
स्वामी शिवानंद प्रतिष्ठान च्या वतीने मागील 75 वर्षापासून औंध संगीत महोत्सव अविरतपणे सुरु आहे.उदघाटन प्रसंगी,सरपंच रोहिणी थोरात,उपसरपंच बापूसो कुंभार,रमेश चव्हाण,मधुरा टोणेे, प्रदिप कणसे,सुनील पवार,प्रसाद कुलकर्णी,नीता भिडे,शुभदा पराडकर,पं अरुण कशाळकर,अनिल काटदरे,योगेश जहागीरदार,उल्काताई जोशी,मुन्ना मोदी,राजेंद्र गुरव,अंकुश माळी,यांचेसह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
पहिल्या सत्रामध्ये डॉ आश्विनी चांदेकर यांनी अहिरभैरव या ख्याल ने सुरवात करून यावेळी राग रसिया म्हारा आलबेल सजना आयो रे गायला. त्यानंतर राग अलैय्या बलाबल यांनतर संत मिराबाईचे भजन गायन केले.त्यांच्या गायनास तबला साथ सुमित नाईक,हार्मोनियम अनंत जोशी,तानपुरा-अक्षय वर्धवे,संजना कौशिक यांनी साथसंगत केली. यानंतर संगीताचार्य ज्योती काळे यांनी बहादुरी तोडीहा राग गायला,त्याचे महादेव देवन पतीहे बोल होते.तबला-सुमित नाईक,तानपुरा-प्राजक्ता मराठे,श्रुती संवादिनी-तन्मय देवचके यांनी साथ संगत दिली.
पहिल्या सत्राच्या शेवटी यांनी लाचारी तोडी या रागाने व लंगर तुरक बटमारया बोलाने रसिकांना मंत्रमुग्ध केले,त्यानंतर त्यांनी बिलावल थाट गुणकली गायले. त्यांना तबला साथ स्वप्नील भिसे ,संवादिनी केवल कावळे यांनी दिली. यावेळी मुंबई, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह देशाच्या विविध भागातून रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी उशिरा औंध संगीत महोत्सवाच्या द्वितीय सत्रास सुरुवात झाली.
औंध संगीत महोत्सवास प्रारंभ
RELATED ARTICLES