सातारा ः क्रिडाई सातारा अर्थातच कन्फेडरेशन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे सातार्यामध्ये पहिल्यांदाच वास्तू 2016 हे वास्तुविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे क्रिडाई सातारा सेंटरचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दि. 20 ते 23 ऑक्टोबर 2016 रोजी सातारा सिटी बिझनेस सेंटर, राधिका रोड सातारा येथे या वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील आणि शहरातील रियल इस्टेट डेव्हलपर्स आणि विविध कन्स्ट्रक्शन मटेरियलचे वितरक असे सुमारे 50 स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना एकाच छताखाली खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध होणार असल्याचे श्रीधर कंग्राळकर यांनी सांगितले.
क्रिडाई सातारा ही क्रिडाई महाराष्ट्र शी संलग्न संस्था असून सातारा शहरातील सुमारे 50 हून अधिक बिल्डर्स आणि रियल इस्टेट डेव्हलपर्स क्रिडाई साताराचे सदस्य आहेत. बांधकाम व्यवसाय अधिकाधिक ग्राहक सुलभ आणि तंत्रशुध्द करणे हे क्रिडाईचे मुख्य उद्दीष्ट आहे. ग्राहक आणि बिल्डर्स यांच्यामधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी देखील क्रिडाई मध्ये कमिटी असून क्रिडाईच्या सभासदांनी पाळावयाची विशिष्ठ नियमावली क्रिडाईने बनविली आहे. या विशिष्ठ नियमावलीतील नियम पाळून क्रिडाई मेंबर ला काम करावे लागते अशी माहिती क्रिडाईचे साताराचे कार्यकारणी सदस्य बाळासाहेब ठक्कर यांनी यावेळी दिली.
सातारा सिटी बिझनेस सेंटर ही सुनियोजीत बांधकाम असलेली व्यापारी इमारत हे या वास्तू 2016 चे प्रदर्शन स्थळ असून ग्राहकांना पार्किंग पासून सर्व सोयी येथे उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे सातारा शहरातील सर्व नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. तसेच ग्राहकांना अनेक पर्यायाबरोबरच खूप सार्या सवलतीदेखील प्रदर्शनातील बुकींगबरोबर मिळणार आहेत.क्रिडाई सातारची संपूर्ण टीम हे प्रदर्शन अधिकाधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करीत असून सर्व सातारकरांनी मुद्दाम वेळ काढून हे प्रदर्शन पहाण्यासाठी सातारा सिटी बिझनेस सेंटर येथे 20 ते 23 ऑक्टोबर 2016 दरम्यान सकाळी 10 रात्री 8 यावेळेत आवर्जून यावे असे आवाहन क्रिडाई सातारचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर आणि उपाध्यक्ष अॅड. कमलेश पिसाळ यांनी केले आहे. यावेळी क्रिडाई साताराचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ, राहुल वखारिया, बाळासाहेब ठक्कर, अमेय आगटे, दिपक पाटील, माजिद कच्छी, अभिजीत पाटील, शकील सय्यद, राजन पोरे व अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.