अपात्र नगरसेवकांनी महाबळेश्वरला 10 वर्ष पाठीमागे नेले; नगरपालिकेचे मोठे नुकसान केले
महाबळेश्वर : जिल्हाधिकारी यांच्या निकालाने समाधानी असून अपात्र नगरसेवकांनी गेले दीड ते 2 वर्षात चुकीच्या पद्धतीने मनमानी कारभार केला तसेच विकासापेक्षा वैयक्तिक सुडाचे राजकारण करून महाबळेश्वरच्या विकासाला खिळ घातली व महाबळेश्वरचे व नगरपालिकेचे फार मोठे नुकसान केले विकासाबाबत महाबळेश्वरला 10 वर्ष पाठीमागे नेले अशी प्रतिक्रिया महाबळेश्वर चे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक तसेच लोकमित्र जन सेवा आघाडीचे प्रमुख डी.एम. बावळेकर यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये न्यायालयीन निकाला नंतर व्यक्त केली.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार महाबळेश्वरच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. उज्वला तोष्णीवाल यांच्या सह नगरसेवक कुमार शिंदे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, नगरसेविका सौ. सुरेखा आखाडे, सौ. संगीता वाडकर, सौ.लीला मानकुंमरे, सौ.विमल पार्टे या आठ नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी मंगळवारी दिला होता . माजी नगराध्यक्षडी.एम. बावळेकर यांनी त्यांच्या कडे 11 मे 2015 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे तसा तक्रार अर्ज केला होता .त्यानिकाला नंतर आज बावळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली
दरम्यान आपण जानेवारी 2015 मध्ये वरील आठ हि नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्या नुसार अपात्र घोषित करावे असा तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र अपात्र नगरसेवकांनी न्यायालयीन विविध युक्त्या (टेकटीज) वापरून विलंब केला व स्वतःच्या स्वार्था पायी महाबळेश्वरचे व महाबळेश्वर पालिकेचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान केले मात्र न्याय देवतेवर आपला विश्वास आहे तेथे देर है पण अंधेर नही हे आजच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे न्याय देवतेने उशिरा का होइना पण योग्य निकाल दिला .अशी समाधानाची डी.एम. बावळेकर यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये व्यक्त केली .
या अपात्र नगरसेवकांनी आमचा त्यावेळचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ. सुनिता आखाडे यांना फूस लावून त्यांना उमेदवारी अर्ज काढून घेण्यास भाग पाडले त्यामुळेच त्यांना नगराध्यक्ष पद मिळाले व सत्ता मिळाली मात्र त्याचा या नगरसेवकांनी गैरफायदा घेत वैयक्तिक अकसाचे राजकारण करून नगरपालिकेचे पर्यायाने महाबळेश्वर शहराचे नुकसान केले शासनाकडून भरघोस निधी वा अनुदान आणले नाही ते आणण्यास ते अपयशी ठरले उलट आम्ही त्या काळात आणलेल्या शासकीय अनुदानातून सुरु केलेली कामे अर्धवट करून निकृष्ट दर्जाची केली आहेत असा आरोप करून डी.एम. बावळेकर म्हणाले की सार्वजनिक व शहराच्या विकासाच्या कामापेक्षा या मंडळीनी वैयक्तिक सूड भावनेतून मनमानी कारभार केला त्यांच्या या मान मनिला कंटाळून अनेक चांगल्या पालिका कर्मचार्यांनी कंटाळून स्वेच्छेने निवृत्ती घेतली. शहराच्या, पालिकेच्या विकासाचे अनेक प्रश्न असताना ते योग्य पद्धतीने व योग्य तर्हेने न हाताळल्याने मोठे नुकसान केले. महाराष्ट्रात शिवसेनेचे व-भाजपचे सरकार असल्यामुळे याचा निकाल आधीच लागला असता व आमची सत्ता असती तर आम्ही शहरासाठी कोट्यावधीचा निधी शासना कडून आणून मोठ्या प्रमाणावर शहराची विकास कामे केली असती असे असले तरी या पुढेही आता आम्ही महारष्ट्र शासनाकडून भरघोस निधी आणून पालिकेच्या पर्यायाने महाबळेश्वरच्या विकासाची घोड दौड चालूच ठेवू असा विश्वासही डी.एम. बावळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत शेवटी व्यक्त केला यावेळी नगरसेवक लक्षमण कोंडाळकर ,सातारा जिल्हा शिवसेना उप प्रमुख राजेश उर्फ बंडा कुंभारदरे, माजी महाबळेश्वर शहर प्रमुख सुनील साळुंखे ,शहर प्रमुख विजय नायडू आदी उपस्थित होते.