सातारा : शाहुनगर येथील नुकत्याच लागलेल्या एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेचा गुरूकुलचा 100 टक्के निकाल लागला असून कु. मिहिर जाशाी याने 99 टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला त्याच बरोबर कुमारी शैली शहा 98.60 टक्के गुण प्राप्त करून दुसरी तर कुमारी समृध्दी बारटक्के 98.00: गुण मिळवून तिसरी आली आहे.सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. लीना जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे , पर्यवेक्षक मोहन बेदरकर, सहपर्यवेक्षिका सौ. सोनाली तांबोळी, वर्गशिक्षिका सौ. अनुराधा कदम यांनी यावेळी अभिनंदन केले.
90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे एकुण 21 विदयार्थी असून शाळेचा सरासरी 82.29 टक्के निकाल लागला आहे. इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांना सौ. लीना जाधव, सौ सोनाली तांबोळी, सौ. अनुराधा कदम , सौ. विदया घाडगे, सौ. मृणालिनी अलगुडे , प्रथमेश घाडगे , प्रदिप निकम यांनी मार्गदर्शन केले.पुढील वाटचालीस सर्व यशस्वी विदयार्थ्योंना मधुकर जाधव , अॅड. राजेंद्र बहुलेकर , नितीन माने , संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
गुरूकुलची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
RELATED ARTICLES