य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नूतन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा जाहीर सत्कार
शिवनगर : कराड नगरपालिका निवडणूकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपच्या विजयी उमेदवार नूतन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी नूतन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी भाजप प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या विजयाचे शिल्पकार भाजप प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले व चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांचा कारखान्याच्यावतीने व कराड तालुका साखर कामगार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले, संपुर्ण राज्याचे या निवडणूकीकडे लक्ष लागले होते. यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभुमी, पर्यटन स्थळ, व भौगोलिक परिस्थीती यामुळे कराड ला विशेष महत्व आहे. या निवडणूकीत भाजपची खरी कसोटी होती. भाजप पक्षाने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. हि निवडणूक अटीतटीची झाली. माजी मुख्यमंत्री ताकदीने निवडणूकीत उतरले होते. प्रस्थापित आमदारांची आघाडीही निवडणूकीत होती. परंतू भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे व कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार व ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविली. मुख्यमंत्री देवेंद्र दादा यांनी शहराच्या विकासासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले .यामुळे कराडची जनता भाजप पक्षाच्या पाठीशी ठाम उभी राहिली. येत्या काळात भाजप पक्षाच्या पाठीशी जनता ठाम उभा राहील असा विश्वास डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड उत्तरच्या नेत्यांना कराडच्या जनतेने धडा शिकवला आहे. तुम्हाला राहत्या घराजवळ पराभव स्विकारवा लागला आहे. त्यांनी उत्तर मध्ये लक्ष घालावे, दक्षिण मध्ये ढवळाढवळ करू नये. असा टोलाही डॉ. अतुल भोसले यांनी आमदार बाळासाहेव पाटील यांंचे नांव न घेता लगावला.
कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले म्हणाले, कारखान्याचा व कराड शहराचा अनेक वर्षापासून चांगला संबध आहे. कराड नगरी ही स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी म्हणुन ओळखली जाते. ग्रामीण भागाचा व कराड शहराचा दैनंदिन संबध येतो. परंतू शहराचा विकास व्हायला पाहीजे तसा झाला नाही. कराड शहराच्या निवडणूकीत सर्व पक्षांचा सहभाग होेता. विरोधी पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढविली नाही यातच त्यांचा पराभव आहे.
मात्र भाजप पक्षाने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे यांनी पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहचवले व त्या लोकांमधून थेट विक्रमी मतांनी भाजप पक्षाच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत . विरोधक पक्षांकडून भाजप पक्ष जातीयवादी पक्ष म्हणून संबोधले जाते. परंतू देशात व राज्यात चांगल्या विचारांचा पक्ष म्हणून भाजप ला निवडून दिले आहे. या नगरपालिका निवडणूकीतही भाजप पक्षाला विजयाी कौल दिला आहे. नूतन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कराड शहराच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवतील. असा विश्वास डॉ.सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.
सत्कारास उत्तर देताना नूतन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, मला कोणतीही राजकिय पार्श्वभुमी नसताना डॉ. सुरेश बाबा व डॉ. अतुल बाबा यांनी मोठी संधी दिली. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी दाखविलेला विश्वास ,कराडच्या जनतेच्या आपेक्षा व शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी दिली. कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे व्हा. चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक दयानंद पाटील, जगदिश जगताप, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, जितेंद्र पाटील,सुजित मोरे, अमोल गुरव, पांडूरंग होनमाने, जयश्री पाटील, मनोज पाटील ,सरपंच प्रविणा हिवरे, संजय गांधी निराधार योजना कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, सोसायटी चेअरमन पै.आनंदराव मोहीते, उमेश शिंदे, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर,बाळासाहेब पाटील व्हि.के मोहिते,राहुल पाटील, नानासो शिंगाडे, पंकज पाटील, बि.के.शिंदे, वसंतराव साळुंखे, सेक्रेटेरी मुकेश पवार आदीसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व्हा. चेअरमन लिंबाजीराव पाटील यांनी केले, सूत्रसंचलन रामभाउ सातपुते यांनी केले, आभार संचालक धोंडीराम जाधव यांनी मानले.