सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट नगराध्यक्ष निवडीचा सर्जिकल स्ट्राईक जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच यशस्वी ठरला आहे. 14 स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये 15 जागा आणि दोन नगराध्यक्षपदे ही भाजपची कामगिरी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीकोनातून महत्तपूर्ण ठरली आहे. सातारा शहरात गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याचा चांगलाच फायदा भाजपला झाला. त्याचे प्रत्यंतर निकाला नंतर दिसुन आले. प्रभाग क्र. 15 येथून आशा पंडीत, प्रभाग क्र. 16 व 17 येथून विजय काटवटे व सिध्दी पवार, प्रभाग क्र. 17 मध्ये धनंजय जांभळे व प्राची शहाणे व प्रभाग क्र. 2 मधून कट्टर उदयनराजेंचा समर्थक भाजपचे मिलिंद काकडे हे निवडून आले. तब्बल 6 सहा जागांवर भाजपने बाजी मारली. शहराच्या पश्चिम भागात सोमवार पेठ ते समर्थ मंदिर चौक या मधल्या पट्ट्यात भाजपची लॉबी चांगलीच सक्रीय असल्याने त्यांचा फायदा उमेदवारांना झाला. दत्ताजी थोरात, अमित कुलकर्णी, दीपक पवार, विठ्ठल बलशेटवार या कोअरकमिटीने एकत्रित घेतलेल्या मेहनतीला अखेर फळ आले. दोन आघाड्यांच्या सत्ता संघर्षात भाजपचा सहा नगरसेवकांचा दबाव गट पालिकेत अस्तित्वात आला. त्यामुळे नव्या समीकरणांची नांदी पहावयास मिळाली.
शहराच्या राजकारणात भाजपची मुसंडी
RELATED ARTICLES