महाबळेश्वर : सत्ता गेल्याचे दु:ख डी. एम् बावळेकरांना पचविता न आल्याने त्यांनी सुड बुध्दीने आमच्या विरूध्द जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीचा निकाल आणखी काही महिने लागला नसता परंतु एकत्रित टोल वसुलीला विरोध करून आंदोलन सुरू केल्याची शिक्षा जिल्हाधिकारी यांनी आमच्या आठ नगरसेवकांना दिली. जनतेसाठी आमचे नगरसेवक पद गेले तरी टोल विरोधात सुरू केलेला लढा आम्ही सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही माजी नगराध्यक्षा उज्वला तोष्णीवाल यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली
पालिकेचे कोणतेही म्हणणे विचारात न घेता वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व हेरीटेज कमेटीचे दिलीप बंड यांनी पर्यटकांकडुन एकत्रित टोल वसुल करण्याची केवळ सुचना केली परंतु वन विभागाने या सूचनेचे रूपांतर आदेशात केले गावाचा विरोध असताना बळाचा वापर करून वन विभागाने दुहेरी टोल वसुली सुरू केली म्हणून गावाने वन विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले सकाळी सुरू झालेले आंदोलन बळाचा धाक दाखवून दाबण्यात आले व सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी तडकाफडकी अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केला गावाच्या हिताचे आंदोलन केल्याची जबर किंमत आम्हाला मोजावी लागली हे कटु सत्य आहे असेही नगराध्यक्षा उज्वला तोष्णीवाल यांनी सांगितले.
डी. एम. बावळेकर हे नगराध्यक्ष असताना राज्यात प्रसिध्द असलेल्या या पर्यटन स्थळाचा विकास खुंटला होता परंतु आ. मकरंद पाटील यांच्या मदतीने स्थानिक राजकारणाच्या चिखलात अडकलेला विकासाचा रथ बाहेर काढुन शहर विकासाची घौडदौड सुरू केली. एकामागुन एक अशा निविन्यपूर्ण विकास योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली. हिंदु स्मशान भूमी रे गार्डन वाहनतळ ग्लॅनोगल डॅम विकास प्राथमिक शाळा इमारती अग्नीशमन केंद्र माखरीया उद्यान सुशोभिकरण जन्नीमाता व मुन्वर हौ. सोसायटी रोड अशी अनेक कामे सांगता येतील ही सर्व कामे आता अंतीत टप्प्यात आहे. या सर्व लोकहितार्थ कामामुळे शहरात पुर्णपणे समाधानाचे वातावरण आहे हीच पोटदुखी बावळेकराना होती म्हणुनच त्यांनी आमचा जास्तीत जास्त वेळ कोट कचेरीत जावा व गावाच्या विकासाचा रथाची घौडदौड रोखली जावी या कुटील हेतुने आमच्या विरूध्द जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली यातुन बावळेकरांचा हेतु जरी सफल झाला असला तरी आम्ही जनतेच्या हितासाठी आमचा संघर्ष या पुढेही असाच चालु ठेवणार आहे. आम्हीही सव्वा दोन वर्षे कारभार केला व बावळेकरांनीही आडीच वर्षे कारभार केला दोन्ही आघाडयांच्या कारभारात बराच फरक होता हे जनतेने अनुभवले आहे. आता पुन्हा पालिका निवडणुका आल्याने कोणात्या आघाडीकडे आपल्या शहराची सुत्रे सोपवायची याचा निर्णय शहरातील सुज्ञ जनताच घेईल असे साूंुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे आव्हांनांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे माजी नगराध्यक्षा उज्वला तोष्णीवाल यांनी स्पष्ट केले. यावेळी गटनेते नगरसेवक संदीपभाऊ साळुंखे नगरसेवीका लिला मानकुंबरे हे उपस्थित होते.