दोन हजार महिला होणार सहभागी
सातारा : सातारा येथील मराठा क्रांती मूक मोर्चा आत जवळ येत चालला आहे. अगदी चारच दिवसांवर मोर्चा येवून ठेपल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधव जागृत झाला आहे. यामध्ये महिलाही आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे सातार्यातीलच महिलांनी पुढे येत शुक्रवार, दि. 30 रोजी सायंकाळी चार वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत सातार शहर आणि शहर परिसरातील सुमारे दोन हजारांहून अधिक महिला, युवती सहभागी होणार आहेत. बाईक रॅलीच्या अनुषंगाने गुरुवारी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
सातारा येथील मराठा क्रांती मूक मोर्चा सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मोर्चामध्ये 25 ते 30 लाख सहभागी होणार असून त्याचे नियोजन अगदी काटेकोरपणे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलही त्यासाठी सतर्क आहे. सातारा येथील मराठा क्रांती मूक मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय तर आहेच त्याचबरोबर तो आणखी कसा वाढावा, यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला सरसावल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली आणि मराठा क्रांती मूक मोर्चा जागृतीसाठी महिलांची विशेष बाईक रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी, दुपारी दोन वाजता काढण्यात येणाजया या बाईक रॅलीचा शुभारंभ चार वाजता होणार असून मोर्चाचा मार्ग मराठा क्रांती मूक मोर्चा जिल्हा कार्यालय ते पोवई नाका, राजवाडा, मोर्चा कार्यालय असा राहणार आहे. बाईक रॅलीत एक हजारहून अधिक दूचाकी सहभागी होणार आहेत. रॅलीसाठी येताना प्रत्येकाने स्वत:ची दूचाकी आणावयाची आहे. साडी ड्रेसकोड असून सहभागी होणार्या महिलांना फेटे कार्यालयातच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, फेटा बांधण्यासाठी जो कोणी असेल त्यासाठी पैसे संबंधित महिलांनीच द्यावयाचे आहेत. ज्यांना फेटे बांधून सहभागी व्हायचे आहे त्यांनी दुपारी तीन वाजण्यापूर्वी मराठा क्रांती मूक मोर्चा कार्यालय, सेव्हन स्टार कॉम्पलेक्स, सातारा बसस्थानका लगत, सातारा येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही महिला समन्वय समितीने केले आहे.
अधिक माहितीसाठी 9823222204, 9823518329, 9673375000, 9561757878, 9921458717, 9552538237, 8975332899 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.