सातारा : सोमवार, दि. 3 रोजी सातारा शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा असून या मोर्चा मध्ये सातारा जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित पˆकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक मार्गात व पार्किंग व्यवस्थेत दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत तात्पुरता बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
दैनंदिन वाहतुकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग, मोर्चाचा मुख्य मार्ग जिल्हा परिषद मैदान – आर.टी.ओ. ऑफिस – मुथा चौक – शासकीय दवाखाना – निर्मल मंगल कार्यालय – पारंगे चौक – एस.टी. स्टँड – राधिका सिग्नल – भारत गॅस एजन्सी – हॉटेल राधिका पॅलेस – बसप्पा पेठ चौक – बारटक्के चौक – राधिका टॉकीज चौक – समर्थ टॉकीज – एमएसईबी ऑफिस – मोती चौक – मारवाडी चौक – देवी चौक – कमानी हौद – अलंकार हॉल, शाहू चौक – सयाजीराव हायस्कूल – पोवई नाका असा असणार असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
राधिका सिग्नल चौक – मनाली हॉटेल – प्रिया व्हरायटी- आर. के. बॅटरी – शेटे चौक – शनिवार पेठ – सम्राट चौक – मोती चौक हा मार्ग आपत्कालीन परिस्थितीत शासकीय, पोलीस, रुग्णवाहिका व फायर ब्रिगेड इ. वाहनांसाठी आरक्षित केले असून इतर वाहनांची वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे.
शाहू चौक – समर्थ मंदिर – बोगदा तसेच समर्थ मंदिर ते मोती चौक हा आपत्कालीन परिस्थितीसाठी शासकीय, पोलीस, रुग्णवाहिका व फायर ब्रिगेड इ. वाहनांसाठी आरक्षित केले असून इतर वाहनांची वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे.आनेवाडी टोलनाका ते तासवडे टोलनाक्याची सर्व वाहतूक मोर्चातील वाहनांसाठी हायवेच्या पश्चिम बाजू आरक्षित करण्यात येणार आहे. हायवेची पूर्व बाजू इतर वाहनांसाठी ये – जा करण्यासाठी वापरण्यात यावी. मनाली हॉटेल ते पोवई नाका, पारंगे चौक ते पोवई नाका, सिव्हील हॉस्पिटल ते पोवई नाका, बांधकाम भवन ते पोवई नाका, प्रिया व्हरायटी ते पोवई नाका, आरटीओ ऑफिस चौक ते पोवई नाका, साईबाबा मंदिर ते पोवई नाका या मार्गावर मोर्चातील लोकांची गर्दी जास्त होणार असल्याने हे मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत.