कराड : नगरपरिषदेची येणारी पंचवार्षीक निवडणुक स्वच्छ प्रतिमा असणार्या तरूणांच्या माध्यमातन लढविण्यात येणार आहे. कराड शहर नागरी विकास आघाडी असे काकांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे नाव असेल. माजी आ. विलासराव पाटील (काका) उंडाळकर यांचे या आघाडीला मार्गदर्शन लाभेल असे माजी नगराध्यक्ष, कराड शहर नागरी विकास आघाडीचे अध्यक्ष अशोकराव भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या वेळी माजी.आ.विलासराव पाटील (काका) उंडाळकर, माजी नगरसेवक मझहर कागदी, माजी नगरसेविका सौ. सावित्री मुढेकर, बाळासाहेब मोहिते, विजय मुढेकर, प्रकाशराव जाधव, विलासराव कदम यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
अशोकराव भोसले पुढे म्हणाले, कराड शहराला यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे. स्वच्छ व सुंदर कराडची शहरवासियांना अपेक्षा होती. मात्र सत्ताधार्यानी नागरीकांची ही आशा धुळीला मिळवली आहे. आज कराड म्हटले की बकाल शहर अशी त्याची व्याख्या झाली आहे. शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहन चालक, नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. 24 तास पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. गेली आठ वर्षे ही योजना रखडली आहे. या कामाचे त्यामुळे इस्टीमेंट वाढले आहे.
शहरातील कचरा निर्मुलनासाठी माजी आ.विलासराव पाटील (काका) यांनी प्रयत्न करून पार्ले ता. कराड येथे 25 एकर जागा मिळवून दिली होती. परंतु काही राजकारणी मंडळींनी त्यात राजकारण आणुन हा प्रकल्प बंद पाडला. नगरपरिषदेने शहरातील मागासवर्गीया करीता पाच टक्के फंड खर्च करावा असा कायदा आहे. मात्र या कायदयाला बगल देण्यात येऊन मागास वर्गीयांचा विकास रोखला गेला आहे. भाजी मंडईत पालिकेच्यावतीने गाळे बांधण्यात आले. परंतू त्या गाळेधारकांच्या समोरची अतीक्रमने न काढल्याने सदरच्या गाळे धारकांनी आपले व्यवसाय चालू केले नाहीत व न.पा.ला भाडेही दिले नाही. त्यामुळे न.पा.चा तोटा झाला आहे. माजी आ. विलासराव पाटील काका यांनी आपल्या आमदारकीच्या काळात शहराच्या विकासाकरीता अनेक विभागात निधी खर्च केला. शहराचा ज्या पध्दतीने विकास व्हायला पाहिजे होता तो सत्ताधार्याकडून झालेला नाही. येणार्या निवडणुकीत आम्ही स्वच्छ प्रतिमेच्या तरूणाना नेतृत्व करण्याची संधी देणार आहोत. शहरातील सर्व वार्ड आम्ही कराड शहर नागरी विकास आघाडीच्या माध्यमातुन उठविणार आहोत.
माजी आ. विलासराव पाटील (काका) यावेळी बोलताना म्हणाले शहराला सामाजिक, शैक्षणीक, राजकीय परंपरा आहे. मी आमदार असताना शहराच्या विकासासाठी मोठा निधी खर्च केला. शहरातील करदात्याना पालिकेकडून सर्व प्रकारच्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी नकारात्मक भुमिका घेतली जात आहे. शहराचा विकास साधायचा असेल तर न.पा.च्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेच्या तरूाणांची गरज आहे. न.पा.च्या होणार्या निवडणुकीत कराड शहर नागरी विकास आघाडीने आपला जाहिर नामा जाहिर करावा असेही काकानी यावेळी सुचित केले.
मझहर कागदी म्हणाले, कराड शहराला यशवंतराव चव्हाण यांनी वैभव प्राप्त करून दिले. त्याचं कराडची आज दयनिय अवस्था झाली आहे. पलिकेच्या निवडणूकीत तरूणांना संधी देण्यात येऊन त्यांच्या माध्यमातून शहराचा विकास सााधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेवटी बाळासाहेब मोहिते यांनी आभार मानले.