सातारा : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणूकीत सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहकारी सहाय्य संस्था मर्यादित सातारा या संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील (काका) यांनी 117 मते मिळवून विजयी झाले.
दि.2 ऑक्टोबर 2016 रोजी सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्याच दिवशी सायंकाळी 4 वा. मतमोजणी करून निकाल जाहिर करण्यात आला. सर्वसाधारण खुल्या प्रवर्ग मतदार संघातून संचालक पदासाठी प्रकाश पाटील (काका) यांच्या विरोधात विनोद कुलकर्णी, अविनाश कदम, नरेंद्र पाटील, सुनिल पोळ, शिरीष चिटणीस असे रथी, महारथी उभे होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रकाश पाटील (काका) यांचे सर्वच स्तरातून अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.