मायणी :- (सतीश डोंगरे मायणी)
ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी अभयारण्य अशी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात नावलौकिक असणारे मायणी येथील दुर्मिळ पक्षांचे आश्रयस्थान आजमितीस तलाव कोरडा पडल्याने पक्षांच्या अनुपस्तिथीने पर्यटकांची ओघ थंडावलेला पहावयास मिळत आहे.
सन१८९०च्या दशकामध्ये सुमारे ३५फूट खोल व ५००एकर क्षेत्रात पसरलेला ऐतिहासिक तलाव सध्या पूर्णपणे कोरडा पडलेला आहे.यामुळे ऐन सुट्टीच्या कालावधीत पर्यटक व पक्षांनीही या तलाव्याकडे पाठ फिरवली आहे.चांद नदीवर या ऐतिहासिक तलावाची बांधणी करण्यात आली आहे.या तलाव्यामुळे सांगली सातारा जिल्यातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले,तलाव बारमाही झाल्यामुळे दरवर्षी विविध जातीचे बदक, कांडे ,करकुचे चक्रवाक, सारंग, डोम कावळा पर्यटकांचे खास आकर्षण असणारा फ्लेमिंगो (रोहित पक्षी) अशा विविध देशी विदेशी पक्षांचे आगमन होत होते,हा संपूर्ण परिसर पक्षांच्या किलबिलटाने गजबजून जात असतो.
शासनाने याची दखल घेऊन १९८५/८६मध्ये येथील ६५हेक्टर क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले होते .या ठिकाणी असलेला तलाव हा १०० वर्षांपेक्षाही जुना आहे. या दुष्काळी भागातील शेतीला पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा तलाव बांधण्यात आला. वनखात्याच्या मार्फत या तलावाच्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढवून या परिसराचे अरण्यात रुपांतर केले आहे. म्हणजेच या ठिकाणी पक्षांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवार्यासाठी उंच झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केवळ देशातीलच नव्हेतर परदेशतील नाना प्रकारचे पक्षीवृंद येथे हिवाळ्यात आसर्यासाठी येतात.सुमारे ४०० प्रकारचे पक्षी येण्याची येथे नोंद आहे . येथे येणाऱ्या पक्ष्यां मध्ये खास आर्कषण म्हणजे सैबेरीयातुन येणारा फ्लेमिंगो , उत्तर ध्रुवावरुण येणारा किंगफिशर हे या पक्षी आश्रय स्थानाचे खास वैशिष्ठ . तसेच कुट , ब्रम्हणी बदक , काळे बदक , बगळे, सुतार पक्षी , कर्कश आवाज करणारा कांडाकरकोचा भारतीय पक्ष्यांमध्ये मोर – लांडोर , पोपट – मैना ,मोरघार , पानकोबडी अशाप्रकारचे अनेक स्थलांतरीत पक्षी हिवाळ्यातील आक्टोंबर ते फेब्रुवारी महिण्यामधे अढळतात . तसेच १.५ हेक्टर परिसरात हे विस्तारलेले अभयारण्य म्हणजे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य होय.या जलाशयाशेजारी काही औषधी वनस्पती,) देखील आढळतात.या तलावाच्या मध्यात एक मारुतीचे मंदिर आहे या मंदिरात पुरातन हनूमानाची शेंदुर लेपित मुर्ती आहे .
पक्षी अभयारण्य म्हणून नावारूपास आल्यानंतर येथे पर्यटकासाठी निवास व भोजन व्यवस्था ,निरीक्षण मनोरे,बागबगीचा बैठक व्यवस्था आदी सोयी सुबोध झाल्या होत्या. तलाव बारमाही पाण्याने भरलेला असल्याने येथील वेगवेगळ्या पक्षांचे आश्रयस्थान होते.म्हणून पर्यटकांचीसंख्याही येथील वाढू लागली होती.
गेल्या पाच ते सहा वर्षात मात्र या निसर्गरम्य पक्षी अभयारण्याला ग्रहण लागले आहे. घटलेले पर्जम्यामन अन शासनाचे दुर्लक्ष यामुळे तलाव कोरडा व ठणठणीत पडला आहे . शिवाय गाळ साचल्या मुळे पस्तीस फूट खोल असणारा हा तलाव सध्या गाळाने भरलेला आढळतो . सततच्या दुष्काळामुळे आजूबाजूचां परिसर रुक्ष झाला आहे .त्यामुळे सर्वच पक्षांनी या तलाव्याकडे पाठ फिरवली आहे .परंतु पर्यटकांसाठी बांधण्यात आलेले निरीक्षण मनोरे , ऐतिहासिक बांधकाम येथील गतवैभवाची साक्ष देत उभे आहेत .
एकेकाळचे ऐतिहासिक वैभव मायणी पक्षी अभयारण्य हे पर्यटक व पक्षी अभ्यासासाठी एक पर्वणी होती ऑक्टोंबर ते जानेवारी दरम्यान देशी विदेशी पक्षांचे येथे आगमन व्हायचे त्यामुळे पर्यटकांची संख्याही भरपूर होती . सध्या मात्र ते सर्वच वैभव कालबाहय झाल्याचे चित्र आहे . त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे .
खटाव माण या सदैव दुष्काळी तालुक्यातील या ब्रिटिशकालीन तलावामुळे येथील निसर्ग सौदर्य अलौकिक होते . परंतु गेल्या अनेक वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी ,वनखाते व शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होताना दिसून येत आहे.