म्हसवड: माझ्या मासाळवाडी या गावचा प्रथमच मला मिळालेल्या नगराध्यक्ष या पदामुळे सन्मान आ. गोरे यांच्यामुळे झाला आहे. मिळेलेल्या संधीचे सोने विकास कामाच्या माध्यमातून करून पालिका सक्षम करून आ. गोरे याच्या पाठीमागे समाज उभा करण्याचे वचन यावेळी नगराध्यक्ष डॉ वसंत मासाळ यानी व्यक्त केले.
म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षपदी डॉ. वसंत सावळा मासाळ यांची तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा माने यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले.
डॉ मासाळ यांची नगराध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर करताच समर्थकांनी फटाक्याची अतिष बाजी करत आनंद व्यक्त करीत डॉल्बीच्या तालावर व हलगीच्या ठेक्यावर अनेकांनी ठेका धरून फेटे उडवत शहरातुन मिरवणुक काढून ग्राम दैवताचे दर्शन घेत मासाळवाडी गावातून फेरी काढण्यात आली. तहसीलदार सुरेखा माने (निवडनुक निर्णय अधिकारी ) यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडीची सभा पालिका सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष रूपाली कोले मुख्याधिकारी पंडीत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या सभेला पालिकेचे गट नेते विजय सिन्हा पक्षप्रतोद विजय धट नितीन दोशी सुरेश म्हेञे प्रतिभा लोंखंडे सुनिता डावकरे संजय सोनवणे जवाहर देशमाने राजु कोले पोपट मासाळ अकिल काझी शिवाजी लोखंडे बबन आबदागिरे सुरज ढोले नारायण मासाळ उपस्थित होते यावेळी , तहसीलदार माने व पालिकेच्या वतिने मुख्याधिकारी पाटिल यानी नगराध्यक्ष वसंत मासाळ याचा सत्कार केला निवडी नंतर नगराध्यक्ष डॉ वसंत मासाळ म्हणाले तालुक्यचे नेते व पालिकेचे सर्वेसर्वा आ. जयकुमार गोरे याच्या प्रयत्नांमुळे आज मला या मोठ्या पदाची संधी मिळाली असुन या संधीचा मी निश्चितच सोने करिन.