
पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिनी शहराध्यक्ष राहूल पवार यांचा स्तुत्य उपक्रम
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (बुधवार) मनसेच्या शहर शाखेचे प्रमुख राहूल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रिमांड होम मधील विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप तसेच जिल्हा रुग्णालयात रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान व फळवाटचा उपक्रम राबविण्यात आला.शहराध्यक्ष राहूल पवार, खेडच्या उपसरपंच सौ. सुशिला मोझर, मनसे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. अनिता जाधव, उपाध्यक्ष दिलीप सोडमिसे, सुहास रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम झाले. रिमांड होम मधील कार्यक्रमात शहराध्यक्ष राहूल पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम मधील विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटपाचा कार्यक्रम अखंडितपणे आयोजित करीत आहे. यावर्षी 84 मुला – मुलींना गणवेशांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. आजवर 350 हून अधिक निराधार व गरजू मुलांना पक्षप्रमुखांच्या वाढदिनाचे औचित्य साधून गणवेश व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले असून रक्तदान, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले आहेत. यापुढेही विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा अखंडित सुरू ठेवणार आहे. वेळोवेळी अजिंक्यतारा किल्ला परिसर व जिल्हा रुग्णालयाच्या मार्गावर विविध वृक्ष लावून सामाजिक जपली आहे. यावेळी सौ. सुशीलाताई मोझर, सौ. अनिता जाधव यांचीही भाषणे झाली. शाखाध्यक्ष कुणाल चव्हाण, यांनी प्रास्ताविक केले. अनिकेत साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. तर अनिल सोडमिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास वैभव वेळापुरे, जगन्नाथ अवटे, अर्जुन जाधव, सिध्दार्थ जाधव, सागर पवार, शेखर चव्हाण आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, वाढदिवसानिमित्त राजसाहेब ठाकरे यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्याचेही राहूल पवार यांनी सांगितले.