सातारा ः सातारा पालिकेत ध चा मा करून राजकीयच काय तर प्रशासकीय संदर्भही हातोहात बदलले जातात. यामध्ये जिल्हयातील एकमेव अ वर्ग असणारी शाहूनगरीची ऐतिहासिक नगरपालिका भलतीच प्रसिध्द आहे. नियमाची मोडतोड करूनही आपण नियमाच्या चौकटीतच चालतो असा कांगावा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. राज्य संवर्गातील कर्मचारी बदल्यांच्या निमित्ताने पालिकेतील भल्याभल्या कर्मचार्यांच्या खुर्च्या हलल्या. आता फ लटण वरून सहाय्यक लेखापाल म्हणून बदलून आलेल्या एकनाथ गवारी यांच्या बदलीमुळे सातारा पालिकेच्या लेखा विभागात विद्यमान लेखापाल यांची अडचण होणार आहे. हा तांत्रिक गंुंता कायदेशीर दृष्टया मुख्याधिकारी शंंकरराव गोरे कसा सोडवणार याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. बुधवारी बदलुन आलेले सहाय्यक लेखापाल एकनाथ गवारी सकाळी 11 वाजता सुट्टी संपवून नगरपालिकेत हजर झाले. व मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांना त्यांनी हजेरी पण दिली. पहिल्या दिवशी मात्र गवारी यांना लेखाविभागात बसा लवकरच आपल्याला कामाची जबाबदारी दिली जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे बदलून आलेल्या लेखापालांना कोणत्याही कामाशिवाय पहिला दिवस रिकामाच घालवावा लागला. या अडचणीची तांत्रिक नांेंद आस्थापना विभागाच्या रेकॉर्डवर स्पष्टपणे दिसून येते. 2010 च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट सहाय्यक लेखापाल पदी नियुक्त झालेल्या गवारी यांनी फलटण नगरपालिकेत लेखापाल पदावर सलग सात वर्षे काम केले आहे. राज्यशासनाच्या नव्या नियमाने राज्य संवर्गातील 1800 कर्मचार्यांना राज्यात इतरत्र पळावे लागले. सातारा जिल्ह्यातही 8 कर्मचारी जिल्ह्याबाहेर रवाना झाले. त्याच नियमाने तिन कर्मचार्यांच्या मोबदल्यात फक्त एकच कर्मचारी सातारा पालिकेत बदलून आला. पण आता गेल्या वर्षभरापासून लेखापाल पदावर राजकीय वरदहस्तामुळे ठाण मांडून बसलेल्या विवेक जाधव या विद्यमान लेखाधिकार्यांना कसे हटवायचे हा गहन राजकीय प्रश्न पालिकेचे प्रशासन सांभाळणार्या मुख्याधिकार्यांना पडला आहे. वास्तविकरित्या गवारी हे एक जूनलाच सातारा पालिकेत हजर झाले. आणि घरगुती अडचणीमुळे आठवडाभराच्या सुट्टीवर गेले. व बुधवारी पुन्हा कामावर हजर झाल्यावर त्यांना सहाय्यक लेखापालपदाची जबाबदारी देणे आवश्यक होते, मात्र अ वर्ग पालिकेत विद्यमान आणि बदलून आलेले दोन लेखापाल एकाच विभागात आल्याने तु का मी हा वाद बदल्यांच्या निमित्ताने निर्माण झाला आहे, नियमानुसार पद आणि त्याची अर्हता लक्षात घेता गवारी यांचा या पदावर पुरेपूर हक्क आहे. मात्र सातारा पालिकेत नगरपालिका अधिनियम 1965 नाही तर खासदार उदयनराजे भोसले अधिनियम चालतो. इथे सर्व शासकीय अधिनियम सोयीस्कररित्या शिथिल होतात. त्याचाच फटका गवारी यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून लेखाविभागात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे गवारी यांनी जबाबदारी मिळाणार का हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मी कामावर हजर झालो.