प्रख्यात शास्त्रज्ञ माशेलकर यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुररस्कार प्रदान
सातारा : आज अंध श्रध्देचे जोखड उखडून टाकण्यासाठी आधूनिक विज्ञाना बरोबरच चांगल्या शिक्षणाचीही तितकीच गरज आहे अन्यथा एकीकडे मंगळावर पहिल्या प्रयत्नात भारताने यशस्वीपणे सोडलेले मंगल यानाबद्दल जगात वाहवा मिळवत असताना दुसरीकडे मंगळ आहे म्हणून मुलीचे लग्न जमत नाही ही बाब मोठी शोचनीय आहे यसाठी समाजाची विज्ञाननिष्ठता वाढवणे जरुरीचे आहे नाही असे उद्गार ज्येष्ठ रसायन शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
सातारा नगरीचे सुपुत्र आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा पालिकेतर्फे देण्यात चौथा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी माशेलकरांनी वरील उदगार काढले.
एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या पुरस्काराचे वितरण सातारा नगरपालिकेच्यावतीने शाहू कला मंदिरात ज्येष्ठ लेखक,विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्याहस्ते करण्यात आले .यावेळी डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार निवडी समितीतील नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, डॉ. हमीद दाभोलकर . विरोधी पक्षनेता अॅड. बाळासाहेब बाबर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी, विनोद कुलकर्णी, पत्रकार सागर देशपांडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
समारभंाची सुरुवात आपल्या प्रास्ताविकात उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी गेल्या चार वर्षांपासून डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची स्मृती म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येतआहे. पहिला पुरस्कार डॉ.अभय बंग आणि त्यांच्या पत्नी सौ.राणी बंग यांना तर दुसरा पुरस्कार डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांना देण्यात आला होता. तिसरा पुरस्कार प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी सौ.मंगला नारळीकर यांना देण्यात आलव आज एका ज्येष्ठ वैज्ञानिकाला म्हणजेच माशेलकर यांना देताना विशेष आनंद होत आहे असे संािंगतले. अॅड. बाळासाहेब बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार सागर देशपांडे यांनी पाहुण्याची ओळख करुन दिली.
विनोद कुलकर्णी यांनी अश्या पुरस्कारासाठी मान्यता नसतानाही विेशेष तरतूद करत जिल्हह्रधकार्यांच्या संमत्तीने हा पुरस्कार पालीकेने सुरु केला व आज देशातील अनेक मान्यवरांना गौरवताना विशेष आनंद होेत असल्याचे सांगितले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा पालिकेने असा पुरस्कार जो माणूस कोणत्याही राजकिय पक्षाशी संबधित नसूनही त्यांचे नावे हा पुरस्कार देण्यास संमत्ती दर्शवली व 1 लाखांचा पुरस्कार देणारी ही देशातील पहिला पालिका असल्याचे बद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले.
आपल्या भाषणात बोलताना डॉ.माशेलकर पुढे म्हणालेकी, आणि देण्यात यणारे हे शिक्षण केवळ शहरात नव्हेतर खेडोपाडी दिले गेले पाहीजे. आज आपला देश विकसनशील देत होउ पाहत आहे.आपले देशातील पारंपारिक शोध व अध्यात्माची जोड घेत सृधाय या सर्वाची सांगड बांधुन जाणीव जागृतीवर संशोधन सुरु आहे. बासमती तांदुळ आणि हळद यावर मी पेटंट घेताना देशाची भूमिका अमेरिकेत मांडली. आपण पॅराशुट सारखे उघडे मन ठेवले तर अंधश्रध्दांची जोखडे निर्माणच होणार नाहीत.विकसीत समाजासाठी विकसीत मनेही तितकीच महत्वाची आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराला सथ थेत सातारापालेकेने राबविलेला पर्यावरण पुरक आणि डॉल्बी मुक्त गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यात एक आदर्श उत्सव म्हणून पुढे यावा.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. रावसाहेब कसबे यंानी आजचा हा सोहळा म्हणजे मला लाभलेला एक उत्तम योग आहे.आज अश्या मान्यवरांच्या सत्काराचे कार्यं माझे हातून होताना मला अ्रिधक आनंद होत आहे. सातारा पालीकेचा हा आदर्श उपक्रम सर्व देशभर जावा नरेंद्र ने समाजालला दृष्ठी दिली. व हे अवघड काम आज त्याच्या पश्चातही सुरु आहे. मारणारी माणसे ही विचारांचा खून करु शकत नाहीत. आज अंनिसचे आंदोलन खुनानांतर अधिक प्रभावी व जोमाने विस्तारत आहे. दाघभेलकरांच्या खूनानंतरच जादू टोणा कायदा संम्मत झाला. अनेकांना डॉ नरेंद्र हे खुनानंतर कळले त्याचे कायं पश्चात देशभर व परदेशात पोहचले आहे. असे सांगितले.
याच सोहळयात सातारचे डॉ. सचीन जाधव व मानपत्राचे लेखन करणारे डॉ. उमेश करंबेळकर यांचा सत्कार माशेलकर यांचे हस्ते करण्यात आला.
समारंभाचे सुत्र संचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार विजय बडेकर यांनी मानले. सोहळृयास संभाजीराव पाटणे, प्राचार्यं पुरूषोत्तम शेठ ,डॉ.राजेंद्र माने यांचेसह विविध क्षेत्राताील मान्यवर , अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पदाध्रिकारी व कार्यंकर्ते डॉ. चित्रा दाभोलकर,डॉ. प्रसन्न दाभेालकर, पालीकेच्या नगरसेविका,नगर सेवक तसेच सतारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते