सातारा : सातारा शहरातील के. बी. पी. कॉलेज चौकात माधवराव मिसळ हाऊसचे समोर फटाके फोडून सार्वजनिक शांततेचा भंग करुन वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थ डे बॉय अभिषेक सदाशिव गाडे (वय 23, रा. प्लॉट नं. 2, निसर्ग अपार्टमेंट, भुरके कॉलनी सदरबझार व त्यांच्या मित्रासह 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सदरबझार येथील अभिषेक गाडे या युवकाचा रविवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने केबीपी कॉलेज चौकात माधवराव मिसळ हाऊस समोर मित्रांनी फटाके वाजविले होते. याबाबत या परिसरात राहणार्या एका नागरिकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात फोन करुन माहिती दिली होती. यानंतर पोलिस कर्मचारी, अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेवून अभिषेक गाडे, संग्राम शिंगटे (वय 49, रा. देशमुख कॉलनी सातारा) सिध्दार्थ माने (वय 24, रा. 12/8 देशमुख कॉलनी सातारा) लव आवळे (वय 28) रा. पंताचा गोट, योगेश पावशे (वय 21, रा. 168 सदाशिव पेठ), गोविंद राव (वय 24, रा. गुलमोहर कॉलनी, शाहबाज शेख (वय 22, रा. कोंडवे, श्रीकांत माने (वय 31, रा. राधा कृष्णनगर, आरबाज मुलाणी (वय 20, रा. रविवार पेठ, शुभम नाईक (वय 23, रा. पंताचा गोट, अमित रणनवरे (वय 23, रा. शाहुनगर, शुभम सावंत (वय 22, रा. कांगा कॉलनी), किसनराव (वय 25, रा. गुलमोहर कॉलनी, धनेश देशपांडे (वय 19, रा. 406 मंगळवार पेठ), अभिषेक गाडे (वय 23, रा. भुरके कॉलनी, अक्षय ओसवाल (वय 23, रा. सदाशिव पेठ, गणेश भांगलोकर (वय 30, सोमवार पेठ), महेश शबनम (वय 40, रा. माची पेठ), अक्षय कदम (वय 19, उत्तेकरनगर सदरबझार), राज चव्हाण (वय 18, रा. शाहुनगर), प्रसाद शेलार (वय 28, रा. शाहुनगर), प्रतिक नाईक (वय 24, रा. पंताचा गोट), सचिन कासुर्डे (वय 34, रा. गोडोली), तेजस साळुंखे (वय 23, रा. यादोगोपाळ पेठ), राजदिप जाधव (वय 20, रा. कोडोली), रत्नतेज मोरे (वय 19, रा. गोडोली), आदित्य वांगकर (वय 22, रा. मंगळवार पेठ), अलोक कान्हेरे (वय 28, रा. रविवार पेठ सातारा) या 30 जणांविरुध्द मुंबई पोलिस कायदा कलम 110, 117 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली.
या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता 100 ते 700 रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केली.