सातारा : सातारा नगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहचला आहे. नगरविकास आघाडीचे नेते आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या भागात पदयात्रांचा आणि घर टू घर भेटीचा धडाका सुरु केला आहे. दररोज दोन कोपरा सभा होत असल्याने या सभांनाही नागरिकांची गर्दी वाढत असल्याने नगरविकास आघाडीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.
नगरविकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार दिला आहे. तसेच प्रत्येक प्रभागासाठीही जनतेसाठी काम करणारे उमेदवार दिले आहेत. एक चांगली टीम निवडणूक लढवत असून जनतेच्या समस्या आणि प्रश्नांची जाण असलेल्या नगरविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागरिकांना केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पदयात्रेला 7 वाजता समर्थ मंदीर चौकातून प्रारंभ झाला. समर्थ मंदीरापासून बोगदा ते पॉवर हाऊस, संपत महाडीक घर, भुईगल्ली, दत्त चौक, पोळ वस्ती, चिपळूणकर कॉलनी, ढोणे कॉलनी, मांढरे आळी, खारी विहीर, महेश महाडीक घर, राजू भोसले घर, डफळे हौद, तारळेकर चौक, मनामती चौक, डॉ. तांबे दवाखाना, नागाचा पार, भटजी महाराज मठ आळी, कात्रेवाडा, हेगडेवार चौक, कोल्हटकर आळी, रमेश जाधव घर ते चांदणी चौक या मार्गावरुन ही पदयात्रा झाली. पदयात्रेत नविआचे उमेदवार रवींद्र ढोणे, सौ. सोनाली नलवडे, महेश राजेमहाडीक, सौ. लिना गोरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष सचिन सारस, राजू गोरे, रवी माने, किरण ढोणे, विक्रम ढोणे, सोमनाथ थिटे, डी.पी. शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि उमेदवारांचे औक्षण करुन आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आ. शिवेंद्रसिंहराजे व उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपुलकीचा संवाद साधला आणि नगर विकास आघाडीची भुमिका समाजावून सांगितली. सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी, शहराची प्रगती करण्यासाठी नगरविकास आघाडीला साथ द्या.
जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदयात्रेदरम्यान नागरिकांना दिला. सातारा शहराचा पुढील पाच वर्षात कायापालट करण्यासाठी नगरविकास आघाडी कटीबध्द आहे. आघाडीच्या काठीला म्हणजेच शहराच्या विकासाला मत देवून सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
दरम्यान, सौ. वेदांतिकाराजे यांनी प्रभाग 2 मध्ये घर टू घर भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आघाडीच्या उमेदवार सौ. सुजाता घोरपडे, सूरज सोलंकी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जरंडेश्वर नाक्यावरील मारुतीचे दर्शन घेवून सौ. वेदांतिकाराजे यांनी प्राचाराला सुरुवात केली. प्रभाग 2 मधील प्रत्येक कॉलनीत जावून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रत्येक घरात जावून वडीलधार्यांचा आशिर्वाद घेतला आणि नगरविकास आघाडीची भुमिका स्पष्ट केली. नागरिकांनीही सौ. वेदांतिकाराजे यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करुन नगरविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पदयात्रा आणि घर टू घर भेटीदरम्यान कार्यकर्ते नगर विकास आघाडीचा जाहिरनामा मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. नागरिक प्रथम, माझ शहर हेच माझ घर या ब्रीदवाक्यामुळे नागरिकांचा पदयात्रांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे.