Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीसातारा नगरपालिकेची मंगळवारची सभा वादळी ठरणार 

सातारा नगरपालिकेची मंगळवारची सभा वादळी ठरणार 

सातारा : सातारा पालिकेची मंगळवारी सकाळी अकरा वा. छत्रपती शिवाजी सभागृहात होणारी सभा वादळी होण्याची चिन्हे असून सातारा शहरातील काही जमिनींची आरक्षणे रद्द करण्याच्या विषयावरुन जोरदार घमासान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरविकास आघाडी व भाजपा यांनी कोअर कमिट्यांच्या बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सभा सचिव म्हणून राजेश काळे पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेला सामोरे जात आहेत. या सभेत एकूण 38 विषय चर्चेला येत असून यामध्ये भवानी पेेठेतील वॉशिंग रॅम्प भाड्याने देणे, कवारे कॉलनीतील आरक्षित रेखांकन रद्द करणे यासह इतर तीन विषयांवर वादग्रस्त चर्चा होणार असून सातारा विकास आघाडी या सगळ्या घडामोडींना कशी सामोरे जातेे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी ऐनवेळचे विषय चर्चेला आणू नये असे फर्मान बजावले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular