सातारा : माझे पती चंद्रकांत गलांडे यांच्या वीर मरणानंतरही जिल्हा वासियांनी माझे कुटुबियांवर दाखवलेली मायेची उब ही सदेैव यापुढेही वीरगती प्राप्त होणार्या सर्व जवांनाचे कुटुबियांसोबत अशीच राहू दे, असे उद्गार शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांच्या वीरपत्नी श्रीमती निशा गलांडे यांनी काढले.
काश्मीर मधील उरी येथील पाकीस्तानी अतीरेक्यांच्या भ्याड हल्लयात शहीद झालेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी गावचे सपुत्र शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचे कुटुबियांसाठी सातारा येथील नागरीकंाचे वतीने जमा केलेल्या कृतज्ञता निधीचे अर्पण कायर्ंक्रमात श्रीमती गलांडे यांनी वरील उद्गार काढले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ करसल्लालगार अरुण गोडबोले,शेजारी चंद्रकांत गलांडे यांचे वडील शंकर गलांडे, नगरसेवक रवींद्र झुटींग, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक भाषणात पत्रकार विजय मांडके यांनी हा निधी गोळा करण्यामागची भावना व्यक्त करताना सांगितले की, केवळ शहीद कुटुंबीयांच्याप्रती संवेदना दाखवल्या जातात मात्र खर्या अर्थाने त्यांना आर्थिक व मानसिक पाठबळ देण्याची मोठी गरज आहे. आज जमा केलेला हा कृतज्ञता निधी खरोखरच या कुटुंबास उपयोगी ठरणार आहे.
मनोगत व्यक्त करताना अरुण गोडबोले म्हणाले की, अशा घटनातून जवान शहीद झाल्यावर आपण केवळ चर्चा करतो, मात्र ती कृतीत आणण्यासाठी केलेल्या आवाहनाला सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला. हा उपक्रम व्यापक प्रमाणात करता आला असता मात्र काही कायदेशीर बाबी व तांत्रीक अडचणींमुळे या उपक्रमात 72 हजार रुपये एवढा निधी गोळा झाला. विशेष करुन या निधी संकलन कामी राजकीय नेते, व्यापारी,उद्येाजक यांनी अतिशय कमी सहभाग घेतला आणि सामान्य नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग होता. देशात अशा प्रकारे स्थानिक पातळीवर निधी गोळा करण्याचा हा बहुदा पहिलाच उपक्रम असावा यापुढेही लोकांनी श्रेयवादाची अपेक्षा न ठेवता जिल्ह्यातील शहीद जवानांसाठी कायम स्वरुपी निधी उभारण्याची गरज आहे.
नगरसेवक रविंद्र झुटींग यांनी आभार प्रदर्शन केले, याप्रसंगी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, नगर वाचनालयाचे डॉ. शाम बडवे, डॉ. राजेंद्र माने, डॉ. सुरेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, महेश राजेमहाडिक, गौतम भोसले, विद्या आगाशे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामभाउ जाधव, वाय. के. कुलकर्णी, श्री. वाकणीस यांच्यासह माण तालुक्यातील जाशी गावचे बाळासाहेब खाडे, गलांडे कुटुंबीय व सातारा येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायेची सावली अशीच राहू दे : वीरपत्नी निशा गलांडे
RELATED ARTICLES