सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ पालिका व पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आज लक्झरी बसने रवाना झाले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भवनजवळ याची लगबग सुरु होती.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आज जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भोसले, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक राजसाहेब महामुलकर, प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, जि. प. अध्यक्ष सुभाष नरळे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, यांच्यासह जि. प. व पं. स. सदस्य यांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत. या अभ्यास दौर्यामध्ये राजकीय घडामोडी तसेच जिल्हाच्या भविष्य काळात होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निूवडणुकीसंदर्भात रणनिती ठरविली जाणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या सिक्कीम अभ्यास दौर्याला महत्व आले आहे. हा सिक्कीम दौरा हा शासनाच्या खर्चातून आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खर्चातून आहे याची माहिती मात्र मिळालेली नाही. जि. प. चे कृषि सभापती शिवाजीराव शिंदे यांचाही या सिक्कीम अभ्यस दौर्यात सहभाग आहे किंवा नाही, याची माहिती स्पष्ट झालेली नाही. सिक्कीम अभ्यास दौर्याच्या निमित्ताने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आज गर्दी झाली होती.